MPSC : या शनिवारी राज्य सेवा पूर्व परीक्षा ..


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( MPSC ) घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा येत्या शनिवारी म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिली.


राज्य सेवा परीक्षेसाठी ( MPSC ) सुमारे १९ हजार ७७६ परीक्षार्थी बसणार असून शहरातील महाविद्यालये व हायस्कूल अशा एकूण ५८ उपकेंद्रावर परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
परीक्षेकरिता उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी तीन तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवारांनी त्यांचे मुळ ओळखपत्र (आधार कार्ड/ पॅन क्रमांक/ फोटो) व प्रवेश प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत सोबत ठेवावी. उमेदवारांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे व सॅनिटायझर जवळ ठेवणे अनिवार्य आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group