१८ वर्षावरील नागरिकांचे ग्रामीण भागात ऑन द स्पॉट लसीकरण



ग्रामीण भागातील लसीकरण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 400 उपकेंद्रांपैकी रोज 100 उपकेंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ऑन स्पॉट नोंदणी करून त्यांना लस देण्यात येणार आहे. रोज 100 उपकेंद्रांमध्ये ही लस देण्यात येणार आहे. ज्या उपकेंद्रांवर लस देण्यात येणार आहे, त्याची पूर्वकल्पना संबंधित गावांना देण्यात येणार आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असल्याने प्रशासनाच्या वतीने लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सुरुवातीला 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात आली. मे महिन्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाही लस देण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या काळात लसीची उपलब्धता कमी असल्यामुळे 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले होते. आता ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. परंतु त्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती.

गेल्या महिनाभरापासून लसीचा पुरवठा चांगलाच वाढला आहे. 60 वर्षावरील 86 टक्के तर 45 ते 60 वयोगटातील 84 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची संख्या मात्र खूप कमी आहे. ग्रामीण भागामध्ये लस शिल्लक राहू लागल्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला गती देण्यासाठी त्यांच्याकरिता विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group