Thursday, March 28, 2024
Homeअध्यात्मनवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थीला फक्त पाच मिनिटांत करा गणपतीच्या 108 नावांचा...

नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थीला फक्त पाच मिनिटांत करा गणपतीच्या 108 नावांचा जप…

ताजी बातमी ऑनलाइन टीम

हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असे संबोधले जाते. संकष्टी चतुर्थीला गणेश पूजा करून व्रत केल्याने मुले आणि पतीच्या जीवनात येणारे संकटे दूर होतात. प्रगतीत येणारी सर्व विघ्‍ने विघ्नहर्ता दूर करतात. याच दिवशी आई आपल्या मुलांचे दीर्घआयुष्य आणि सौभाग्यासाठी गणपतीकडे आराधना करते. रात्री चंद्रदर्शनानंतर व्रत संपन्न होते.

संकष्टी चतुर्थी 21 जानेवारीला सकाळी 08 वाजून 51 मिनिटाला सुरू होत आहे.

> दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला सकाळी 09 वाजून 41 मिनिटांला समाप्त होईल.

> 21 जानेवारीला रात्री चंद्र दर्शनानतर व्रत संपन्न होईल.

आद्यपूजक गणपतीची विविध नावे प्रचलित आहेत. श्री गणेशाची 108 नावे सांगत आहोत. आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपतीच्या नावांचा जप करून लाडक्या बाप्पाला प्रसन्न करू शकतात. गणपतीच्या प्रत्येक नावाला विशिष्ट अर्थ आहे. गणपतीच्या 108 नावांना ‘गणेश नामावली’ असे देखील संबोधले जाते. गणपतीच्या 108 नावांचा जप केल्याने विघ्नहर्ता आपली सर्व कष्ट दूर करतात.

1. गणाध्यक्ष – सगळ्यांचं नेतृत्त्व करणार
2. गणपती – सर्व गणांचा नेता
3. गौरीसुत – माता गौरीचा पूत्र
4. लंम्बोकर्ण – मोठे कान असलेला
5. लंबोदर – मोठे पोट असलेला
6. महाबल – अधिक बलशाली
7. महागणपती – देवांचा देव
8. महेश्वर – सर्व ब्रह्मांडचा देव
9. मंगलमूर्ती – सर्व शुभकार्यांचा देव
10. मूषकवाहन – ज्याचा सारथी उंदीर आहे.
11. बालगणपती – बालक प्रिय असलेला
12. भालचंद्रा – ज्याच्या मस्तकावर चंद्र आहे.
13. बुद्धिनाथ – बुद्धीचा देव
14. धूम्रवर्ण – धूरा सारखा रंग असलेला
15. एकाक्षर – एकल अक्षर
16. एकदन्त – एक दांत असलेला
17. गजकर्ण – हत्तीप्रमाणे कान असलेला
18. गजानन – हत्तीचं मुख असलेला देव
19. गजवक्र – हत्तीची सूंड असलेला
20. गजवक्त्र – हत्तीसारखं तोंड असलेला
21. देवादेव – सर्वोत्तम
22. देवांतकनाशकारी – वाईट आणि राक्षसांचा नाश करणारा
23. देवव्रत – सर्वची तपश्चर्या स्वीकारतो
24. देवेन्द्राशिक – सर्व देवांचं रक्षण करणारा.
25. धार्मिक – दान देणारा
26. दूर्जा – अजिंक्य देव
27. द्वैमातुर – दोन माता असलेला
28. एकदंष्ट्र – एक असलेला
29. ईशानपुत्र – भगवान शिवशंकराचा पूत्र
30. गदाधर – गदा शस्त्र असलेला
31. अमित – अतुलनीय प्रभु
32. अनन्तचिदरुपम – अनंत आणि व्यक्ति चेतना असलेला
33. अवनीश – संपूर्ण जगाचा पालनहार
34. अविघ्न – अडथळा दूर करणारा
35. भीम – विशाल
36. भूपति – पृथ्वीचा स्वामी
37. भुवनपति – देवांचा देव
38. बुद्धिप्रिय – बुध्दीचा देव
39. बुद्धिविधाता – बुद्धीचा मालक
40. चतुर्भुज – चार भुजा असलेला
41. निदीश्वरम – धन आणि निधीचा दाता
42. प्रथमेश्वर – सर्व देवांमध्ये प्रथम आराध्य
43. शूपकर्ण – मोठे कान असलेला
44. शुभम – सर्व शुभ कार्यांचा प्रभु
45. सिद्धिदाता – इच्छा आणि संधीचा स्वामी
46. सिद्दिविनायक – यश मिळवून देणारा
47. सुरेश्वरम – देवांचा देव
48. वक्रतुण्ड – वक्र सोंड असलेला
49. अखूरथ – सारथी उंदीर आहे असा तो
50. अलम्पता – अनन्त देव
51. क्षिप्रा – आराधना योग्य
52. मनोमय – हृदय जिंकून घेणारा
53. मृत्युंजय – मृत्यूवर विजय मिळवणार
54. मूढाकरम – ज्यामध्ये आनंद राहतो असा तो
55. मुक्तिदायी – शाश्वत आनंद देणारा
56. नादप्रतिष्ठित – जो नादब्रह्मला प्रतिष्ठित करतो असा
57. नमस्थेतु – सर्व कष्ट दूर करणारा
58. नंदन – भगवान शिव शंकराचं पूत्र
59. सिद्धांथ – यश आणि यशस्वीतेचा गुरु
60. पीताम्बर – पिवळे वस्त्र परिधान करणारा
61. गणाध्यक्षिण – सर्व संस्थांचे नेते
62. गुणिन – सर्व गुण संपन्न
63. हरिद्र – सूवर्ण रंग असलेला
64. हेरम्ब – आईचा प्रिय पूत्र
65. कपिल – राखाडी रंग असलेला
66. कवीश – कवींचा स्वामी
67. कीर्ति – यशाचा स्वामी
68. कृपाकर – कृपा करणारा
69. कृष्णपिंगाश – पिवळी-राखाडी डोळे असलेला
70. क्षेमंकरी – क्षमाशील
71. वरदविनायक – यशाचा गुरू
72. वीरगणपती – वीर प्रभु
73. विद्यावारिधि – बुद्धीचा देव
74. विघ्नहर – कष्ट दूर करणारा
75. विघ्नहर्ता – विघ्न दूर करणारा
76. विघ्नविनाशन – अडथळे दूर करणे
77. विघ्नराज – सर्व अडथळ्यावर मात करणारा
78. विघ्नराजेन्द्र – सर्व अडथळ्यांचा भगवान
79. विघ्नविनाशाय – सर्व अडथळे दूर करणारा
80. विघ्नेश्वर – सर्व विघ्न दूर करणारा.
81. श्वेता – शुभ्र रंग असलेला
82. सिद्धिप्रिय – इच्छापूर्ति करणारा
83. स्कन्दपूर्वज – भगवान कार्तिकेयचा बंधू
84. सुमुख – शुभ मुख असलेला
85. स्वरूप – सौंदर्य प्रेमी
86. तरुण – कोणतंही वय नसलेला
87. उद्दण्ड – खोडकर
88. उमापुत्र – पार्वतीचा पूत्र
89. वरगणपती – संधींचा देव
90. वरप्रद – इच्छा आणि संधीचा देव
91. प्रमोद – आनंद
92. पुरुष – अद्भुत व्यक्तिमत्व
93. रक्त – लाल रंगाचं शरीर असलेला
94. रुद्रप्रिय – भगवान शिवाचा आवडता
95. सर्वदेवात्मन – सर्व देवांकडून सन्मान स्विकारणारा
96) सर्वसिद्धांत – कौशल आणि बुद्धीचा दाता
97. सर्वात्मन – ब्रह्मांडाचं रक्षण करणारा
98. ओमकार – ओमचा आकार असलेला
99. शशिवर्णम – चंद्राच्या रंगा सारखा
100. शुभगुणकानन – सर्वगुण संपन्न
101. योगाधिप – ध्यान करणारा परमेश्वर
102. यशस्विन – लोकप्रिय देव
103. यशस्कर – प्रसिद्धी आणि भाग्याचा स्वामी
104. यज्ञकाय – सर्व यज्ञ स्वीकार करणारा
105. विश्वराजा – संसाराचा देवता
106. विकट – अत्यंत विशाल
107. विनायक – सर्वांचा नायक
108. विश्वमुख – ब्रह्मांडाचा गुरु

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -