गणेशोत्सवात राज्यात नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता


गणेश चतुर्थीला काहीच दिवस बाकी असताना सगळीकडे खरेदीची लगबग सुरु झाली आहे. अशात आता गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय.


राज्यात या आठवड्यात सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज आपत्ती व्यवस्थापनाची बैठक बोलावली आहे. गणेशोत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेता या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी काय करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.


विशेषतः गणपतीच्या काळात रात्री सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गर्दी होत असते. त्यातही मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये जास्त गर्दी होत असते. या गर्दीमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती सरकारला वाटते. त्यामुळे राज्यात गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या कालावधीसाठी नाईट कर्फ्यू लावायचा का याबाबतचा आपत्कालीन व्यवस्थापनाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

गणपतीमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group