Friday, June 2, 2023
Homeकोल्हापूरजिल्हा न्यायालयाचे कामकाज आजपासून सुरू

जिल्हा न्यायालयाचे कामकाज आजपासून सुरू


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचे कामकाज मंगळवार दि. ७ सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे. दोन डोस झालेले पक्षकार व वकीलांनी न्यायालयात यावे. मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करावा, स्वत:सह इतरांची काळजी घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र ॲन्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे यांनी केले आहे.
कोरोना महामारीमुळे कोल्हापूर जिल्हयातील सर्वच न्यायालयांचे कामकाज बंद होते. त्यामुळे न्यायालयीन कामकाज झाले नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे.
त्यानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ७ सप्टेंबर, २०२१ पासून जिल्हा न्यायालयाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे परिपत्रक प्रमुख जिल्हा व न्यायाधिश वृषाली जोशी यांनी जाहीर केले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची लाट कमी आली असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाने कोविड १९ चे सर्व नियम व अटींचे पालन करावे, शक्यतो लसीचे दोन डोस झालेल्या वकील व पक्षकारांनी न्यायायालत प्रवेश करावा, काम झाल्यानंतर तातडीने घरी जावे, न्यायालयाच्या आवारात जास्त वेळ बोलत थांबू नये, मास्कचा वापर नियमित करावा. प्रकृती अस्वस्थ वाटत असेल अथवा कोणतेही लक्षण जाणवत असेल तर न्यायालयात येणे टाळावे अशा असे आवाहनही ॲड. घाटगे व बार असोसिएशने अध्यक्ष ॲड. रणजित गावडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group