ताजी बातमी ऑनलाइन टीम
इचलकरंजी/प्रतिनिधी –
जिल्हा परिषद सदस्य तथा जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी साखर, मोलॅसिस आणि इथेनॉल सेक्टरमध्ये केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल टेफलाज आणि शुगर समिट यांच्यावतीने ‘शुगर युथ स्टार ऑफ द इयर 2021’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ. राहुल आवाडे हे सातत्याने सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून विविध क्षेत्रात त्यांची उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे.
टेफला ही कंपनी कॉन्फरन्स, एक्झिबिशन्स आणि पुरस्कार यांमधील भारतातील नामांकित कंपनी आहे. टेफला ने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय औद्योगिक मंडळासाठी ज्ञान क्षेत्र आणि नेटवर्किंग लँडस्केपचा विस्तार करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
शुगर समिट हा असाच एक उपक्रम आहे. कॉन्फरन्स व्यतिरिक्त साखर, मोलॅसिस आणि इथेनॉल सेक्टरमधील विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या व्यक्ती आणि कंपन्यांचा सन्मान करण्यासाठी शुगर समिट अवॉर्ड्सची स्थापना केली आहे. याच श्रेणीतून डॉ. राहुल आवाडे यांना ‘शुगर यूथ स्टार ऑफ द इयर 2021’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गोवा येथील ताज कन्व्हेन्शन सेंटर येथे 24 आणि 25 सप्टेंबर रोजी कॉन्फरन्स, प्रदर्शन आणि पुरस्कार अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने साखर उद्योगातील प्रमुख तसेच भारत आणि परदेशातील मूल्य साखळीतील भागधारक साखर, मोलॅसिस आणि इथेनॉलच्या भविष्यावर चर्चा होणार आहे. डॉ. राहुल आवाडे यांना हा मानाचा पुरस्कार मिळल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल ताराराणी पक्षाच्यावतीने डॉ. राहुल आवाडे यांचा इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते सत्कार केला. याप्रसंगी प्रकाशराव सातपुते, अहमद मुजावर, रुबन आवळे, बाळासाहेब कलागते, अरुण आवळे, सुनिल पाटील, शेखर शहा, नरसिंह पारीक, शंकरराव येसाटे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ताराराणी पक्षाचे पदाधिकारी, आवाडे समर्थक उपस्थित होते.