सध्या सोशल मिडियावर एका स्मशान भूमिचा व्हिडिओ व्हायरल होतोय.या व्हिडिओ मध्ये एका महिलेला मृत घोषित करून अंत्यसंस्कारासाठी भट्टीमध्ये ठेवण्यात आले.आत भट्टी मध्ये ठेवण्यात आल्या नंतर स्मशानातील कर्मचाऱ्यांना त्या मृत महिलेचा आक्रोश येऊ लागला. कर्मचाऱ्यांनी भट्टी उघली, तोपर्यंत उशिर झाला होता. पण या घटनेची संबंधित परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तसेच या घटनेची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या घटनेची सत्य परिस्थिती समोर यायलाचं हवी असे सोशल मिडिया युजर्सचे म्हणणे आहे.
अंत्यविधीबद्दलची एक भयानक कहाणी सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेशी संबंधित कोणतेही बातमी अद्याप समोर आलेली नाही. या घटनेशी निघडीत ठिकाण व वेळ आणि सत्य अद्याप समोर आलेले नाही. या घटनेतील सत्यता आणि घटनेविषयी कोणतीही विश्वसनीय किंवा अधिकृत पुष्टी समोर आलेली नाही. कुबेरगंजमधील एका अंत्यविधीबद्दलची एक भयानक कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, परंतु हे दावे पडताळलेले नाहीत.
पण या महिलेला जिवंत का जाळले ?
या व्हायरल व्हिडिओ मध्ये एका महिलेला जिवंतपणी भट्टीत टाकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर आतून किचाळ्या ऐकू आल्यानंतर लगेलाच स्मशान भूमितील कर्मचाऱ्यांनी भट्टीचा दार उघडला. पण तो पर्यंत उशिर झाला होता. या महिलेवर जिवंत पणी अंत्यविधी करण्यात आला. असा दावा या व्हिडिओ मध्ये केला आहे.
संबंधित महिला जिवंत होती का
या दाव्यामुळे सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे घटना प्रत्यक्षात घडली का, संबंधित महिला जिवंत होती का, तसेच ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली, याची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. त्यामुळे व्हायरल दाव्याची सत्यता अधिकृत माहितीनंतरच स्पष्ट होणार आहे.
