इचलकरंजी महापालिकेच्या सभेमध्ये १ ते २६ आणि पुरवणी विषय पत्रिकेवरील सर्व ८ असे सर्व विषय मंजूर करण्याच्या महापौरांच्या निर्णयावरून बुधवारी झालेल्या सभेत एकच गदारोळ उडाला. विरोधकांनी मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करून महापौरांच्या समोर जाऊन ,कागद भिरकावून घोषणाबाजी केली. (Ichalkaranji) सर्व विषय मंजूर झाल्याचे सांगत सभा संपल्याचे घोषित केले. तर विरोधकांनी मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप केला. इचलकरंजी महापालिकेची आमसभा आज आयोजित केली होती. या सभेमध्ये पटलावर २६ विषय होते तर पुरवणी कार्यक्रम पत्रिकेवर८ विषय होते.
सभेच्या सुरुवातीपासूनच विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. विरोधी नगरसेविका क्रांती आवळे यांनी विरोधी सदस्यांची कामे होत नसल्याची जोरदार तक्रार मांडली. कामे होणार नसेल तर नगरसेवक म्हणून निवडून येऊन उपयोग काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील गायकवाड यांनी महापालिकेतील अधिकारी विरोधकांची कामे घेण्यास विरोध करतात. आमची इस्टिमेट डावलले जाते असाही, त्यांनी आरोप केला. तर महापौर उदय धातुंडे यांनी विषय पत्रिकेवरील मुद्द्यावर चर्चा करण्याचे आवाहन केले. विषय पत्रिका सोडून अन्य विषयावर चर्चा करू नये ,असे आवाहन त्यांनी सभागृहातील सदस्यांना केले. त्यानंतरही विरोधकांचा पवित्रा आक्रमक राहिला . त्यांनी विरोधकांची कामे जात असल्याचा आरोप पुनःपुन्हा केला.
यावरून आणि विरोधी सदस्यांमध्ये सातत्याने शाब्दिक वादावादी होत राहिली. त्यावर विरोधी सदस्यांनी महापौरांच्या समोर येऊन घोषणाबाजी सुरू केली. विषय पत्रिकेचे कागद फाडून विरोधी सदस्यांनी संतापाचे दर्शन घडवले. विरोधकांची आक्रमक भूमिका कायम राहिल्याने अखेर सभाध्यक्ष उदय धातुंदे यांनी सर्व विषय मंजूर झाल्याचे घोषित केले. (Ichalkaranji) त्याला विरोधी सदस्यांनी जोरदारपणे विरोध केला. तथापि राष्ट्रगीत सुरू झाल्याने सभागृह शांत राहिले. यानंतर विरोधी सदस्यांनी क्रांती आवळे , अमरजित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समांतर सभा घेऊन महापालिकेत सुरू असलेल्या वाभाडे काढले.
इचलकरंजी महापालिका स्थापन होऊन दहा महिन्याचा कालावधी झाला. तथपी ,दीर्घ कालावधीमध्ये विरोधी सदस्यांची कामे करण्याकडे कानाडोळा केला जात आहे. प्रभागातील नागरिकांचा कामासाठी नगरसेवकांकडे पाठपुरावा सुरू असतो. कामे होणार नसतील तर महापालिकेच्या सहभागृहात आम्ही चहा नाश्त्यासाठी आलेलो नाही. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आले आहोत, (Ichalkaranji) अशा परखड शब्दात क्रांती आवळे यांनी सत्तारूढ गटाला सुनावले. यावेळी संजय तेलनादे, रणजित जाधव, शिवाजी पाटील, सचिन राणे आदींनी मनोगत व्यक्त केले. महापालिकेच्या या सभेस आयुक्त पल्लवी पाटील, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, तानाजी पोवार, रवी रजपुते आदी उपस्थित होते.
