महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री व तारमार्गतंत्री) पदाच्या एकूण 120 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी व अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री व तारमार्गतंत्री)
पद संख्या – 120 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th, ITI (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा – 18 ते 21 वर्षे
नोकरी ठिकाण – नाशिक
अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मालेगाव मंडल कार्यालय, 132 के.व्ही. उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन www.apprenticeshipindia.gov.in वेबसाईट वर नोंदणी करावी.
नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)