Thursday, April 25, 2024
Homenewsदिलासादायक! होळीनंतर खाद्यतेल झाले स्वस्त, जाणून घ्या नव्या किमती!

दिलासादायक! होळीनंतर खाद्यतेल झाले स्वस्त, जाणून घ्या नव्या किमती!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सततच्या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. खाद्यतेलाच्या किमतीत (Edible Oil Price) सतत होणाऱ्या वाढीमुळे गृहिणींच्या घरचे बजेट कोलमडले आहे. अशामध्ये आता सर्वसामान्यांसोबतच गृहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. जागतिक बाजारात घसरणीनंतर खाद्यतेलाच्या दरात सुद्धा घसरण झाली आहे. होळीनंतर खाद्यतेलाच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शनिवारी दिल्ली बाजारात भुईमूग, सोयाबीन, कापूस बियाणे, मोहरी, सीपीओ आणि पामोलिनसह सर्व तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्याचसोबत इतर देलाचे दर देखील कमी झाले आहेत.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलेशिया एक्सचेंज शुक्रवारी 5.25 टक्क्यांनी घसरला होता. तर, शिकागो एक्सचेंज शुक्रवारी रात्री 3.50 टक्क्यांनी घसरला. परदेशात झालेल्या या घसरणीचा परिणाम स्थानिक तेल आणि तेलबिया व्यवसायावरही दिसून आला आणि भाव तोट्यासह बंद झाले. त्याचाच परिणाम म्हणून देशात देखील खाद्यतेलाच्या दरामध्ये घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय घसरणीचा परिणाम देशातही दिसून येत आहे. तेलाचे दर कमी व्हावेत असी आशा सर्वसामान्यांना होती. अखेर तेलाचे दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


घाऊक बाजारातील खाद्यतेलाचे दर –
– भुईमूग – 6,700 रुपये ते 6,795 रुपये प्रति क्विंटल
– भुईमूग तेल मिल डिलिव्हरी (गुजरात) – 15,600 रुपये प्रति क्विंटल
– भुईमूग सॉल्व्हेंट रिफाइंड तेल – 2,580 रुपये ते 2,770 रुपये प्रति टिन
– मोहरी तेलबिया – 7,500 रुपये ते 7,550 रुपये प्रति क्विंटल
– मोहरीचे तेल दादरी – 15,300 रुपये प्रति क्विंटल
– सरसों पक्की घाणी – 2,425 रुपये ते 2,500 रुपये प्रति टिन
– मोहरी कच्ची घाणी – 2,475 रुपये ते 2,575 रुपये प्रति टिन
– तिळाचे तेल मिल डिलिव्हरी – 17,000 रुपये ते 18,500 रुपये प्रति क्विंटल
– सोयाबीन ऑइल मिल डिलिव्हरी (दिल्ली) – 16,500 रुपये प्रति क्विंटल

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -