Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीसांगली : कोकळे येथे एकावर कोयत्याने हल्ला; दोघांविरोधात गुन्हा दाखल

सांगली : कोकळे येथे एकावर कोयत्याने हल्ला; दोघांविरोधात गुन्हा दाखल

कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे स्टँडवर जुन्या भांडणाचा राग मनात धरून भीमराव बाळासो ओलेकर या तरुणावर कोयत्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

कोल्हापूर : नंदवाळ येथे आरक्षित जागेवर रिंगणावरून धक्काबुक्की

कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात संशयित स्वप्नील संतोष मलमे (सध्या रा. कोकळे, मूळ रा. खरशिंग) याच्यासह एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओलेकर हा कामानिमित्त गावातील एका पान शॉपसमोर उभा राहिला होता. स्वप्नील मलमे व अन्य एकजण तेथे आला. मलमे याने “तुला आता ठेवत नाही”, असे म्हणून ओलेकरवर कोयत्याने वार करून जखमी केले. त्याला मिरज रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत भीमराव याचा भाऊ अक्षय ओलेकर याने पोलिसात फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -