देशात महागाई (Inflation) दिवसेंदिवस वाढत असून सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. अशातच बुधवारी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा (Petrol-Diesel Price Hike Today) भडका उडला. पेट्रोल-डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या 16 दिवसांत (Petrol Diesel Price) तब्बत 10 रुपयांनी इंधनाचे दर वाढवण्यात आले आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले. पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या 22 मार्चपासून आतापर्यत पेट्रोल-डिझेलचे दर 14 वेळा वाढवण्यात आले आहेत. आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105 रुपये 41 पैसे आणि डिझेल 96 रुपये 67 रुपये प्रतिलिटर विक्री केले जात आहे.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये तर तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपये कपात केली होती. त्यानंतर चार नोव्हेंबर, 2021 नंतर इंधनदरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच इंधन दरवाढीचे सत्र पुन्हा एकदा सुरु झाले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या 16 दिवसांत तब्बल 10 रुपयांनी वाढ झाली आहे.