Friday, March 29, 2024
Homeआरोग्यविषयकवेलचीची साल फेकून देत असाल तर थांबा, फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकीत!

वेलचीची साल फेकून देत असाल तर थांबा, फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकीत!

आपल्या स्वयंपाक घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या मसल्यांमध्ये वेलची (Cardamom) असते. एखाद्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. वेलचीचा वास जितका चांगला असतो तितकीच ती स्वादिष्ट असते. वेलची खाल्ल्याने फक्त आपला मूड फ्रेश राहत नाही तर त्याचे अनेक फायदे होतात. वेलचीमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात ज्यामुळे वेलची आपल्याला निरोगी बनवते.

वेलची आपल्या शरिरासाठी जितकी उपयोगी (Cardamom Beneficial For Health) आहे तितकीच तिची सालही उपयुक्त आहे. जर तुम्ही सुद्धा वेलचीचा वापर करत असताना तिची साल फेकून देत असाल तर त्याचे फायदे ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा साल फेकून देणार नाही. वेलचीची साल तुमच्यासाठी अनेक प्रकारे उपयोगी पडू शकते. आज आम्ही तुम्हाला वेलचीची साल आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त (Cardamom Peel Benefits) आहे आणि त्याचा वापर कसा करायचा हे सांगणार आहोत….

वेलचीची साल कशी वापरायची –
– जर तुम्हाला पोटाच्या समस्यांमुळे त्रास होत असेल किंवा पोट साफ करायचे असेल तर सर्वप्रथम वेलचीची साल गोळा करा आणि त्यात हिंग, ओवा, धणे आणि काळे मीठ मिसळा. हे सर्व पदार्थ तव्यावर भाजून घ्या आणि त्याची पावडर तयार करा. हे चूर्ण दररोज जेवल्यानंतर एक चमचा खा. असे केल्याने पोटाची समस्या तर दूर होईलच पण पोट साफही होऊ शकते.

अपचनामुळे किंवा अन्न खाल्ल्यानंतर मळमळ यासारख्या समस्या असतील तर तुम्ही वेलचीच्या साली वापरू शकता. अशामध्ये तुम्ही वेलचीची साल जावित्री चूर्णसोबत बारीक करून घ्या. या चूर्णमध्ये थोडीशी साखर मिक्स करुन त्याचे सेवन करा. असे केल्याने मळमळ होण्याची समस्या तर दूर होईलच पण अपचनापासूनही आराम मिळू शकतो.

टीप – वर नमूद केलेली वेलचीच्या सालीची पूड आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. पण या दोन्हींचा वापर करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी किंवा समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही त्याचा वापर करू नका. तुम्ही कोणतेही विशेष औषध घेत असाल तरी या पावडरचा आहारात समावेश करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत जरूर घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -