कोल्हापूर ; शिंगणापूर बंधाऱ्यावर पंचगंगा नदीत मृतदेह आढळला…


कोल्हापुरातील शिंगणापूर बंधाऱ्यावर पंचगंगा नदीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. बंधाऱ्यावरून दुचाकीस्वार नदीत पडल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली होती. त्यावरून शोध घेतला असता हा मृतदेह सापडला.


या विषयी अधिक माहिती अशी की, पहाटे ३.११ वाजण्याच्या सुमारास शिंगणापूर बंधाऱ्यावरून दुचाकीस्वार पंचगंगा नदीत (panchganga river) पडल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली होती.


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी ताबडतोब जागेवर जाऊन शोध घेतला. पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. सुनील कांबळे, कृष्णा सोरटे, दीपक पाटील, शुभांगी घराले यांनी मोहीम राबविली.

Leave a Reply

Join our WhatsApp group