इचलकरंजी पंचगंगेतील मगरीचा बंदोबस्त करा

ताजी बातमी ऑनलाइन टीम

येथील पंचगंगा नदी परिसरात वारंवार मगरीचे दर्शन होत असल्याने मच्छिमार भयभीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर येथील बागडी समाज विकास मंडळाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांची भेट घेऊन नदी परिसरातील मगरींचा बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन दिले आहे.

दिवाळीनंतर मच्छीमारांनी पुन्हा मासे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र नदीत ४ ते ५ मगरींचे दर्शन झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर नदीकाठावर अनेकांच्या शेती असून शेतात कामासाठी शेतमजूर येत असतात. तसेच नदी घाटावर नियमित पूजापाठ, धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन पंचगंगा नदी परिसरातील मगरींचा बंदोबस्त करून होणाऱ्या दुर्घटनेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. शिष्टमंडळात पै. अमृत भोसले, उत्तम जाधव, किरण सुर्यवंशी, राजु खामकर, संजय सोनुले, विनायक सासणे यांचा समावेश होता.

Open chat
Join our WhatsApp group