Saturday, April 20, 2024
HomeनोकरीPresidential Election 2022: ठरलं, 18 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, 21...

Presidential Election 2022: ठरलं, 18 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, 21 जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

देशाला लवकरच नवे राष्ट्रपती मिळणार आहे. 21 जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. कारण देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे. 18 जुलैला यासाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपत आहे. याआधी देशाच्या पुढील आणि 15व्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. गेल्या 45 वर्षांपासून याच निवडणुक पद्धतीने राष्ट्रपतींची देशाच्या सर्वोच्च पदी निवड होत आहे. 17 जुलै 2017 रोजी अखेरच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या. राष्ट्रपती निवडण्यासाठी सामान्य लोक मतदान करत नाहीत.



तर त्यासाठी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आणि वरच्या सभागृहातील लोकप्रतिनिधी मतदान करतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दोन्ही सभागृहांचे सदस्य लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य मतदान करतील. नव्याने राष्ट्रपदी होण्यासाठी काही नावंही चर्चेत आहेत.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

15 जून अधिसूचना जारी होणार
29 जन उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख
2 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार
18 जुलै, मतदान होणार
21 जुलै, निकाल लागणार

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -