Tuesday, April 16, 2024
Homeब्रेकिंगनापास झालेल्या 10वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक संधी ; पुरवणी...

नापास झालेल्या 10वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक संधी ; पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. तर 8 जूनला 12वीचा निकाल जाहीर झाला होता. दहावी आणि बारवीच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी देखील चांगली कामगिरी केली आहे. बारवीच्या परीक्षेमध्ये 94. 22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, दहावीच्या निकालामध्ये 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या जरी जास्त असली तरी सुद्धा यावर्षी 3.06 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून आणखी एक संधी देण्यात आली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आणखी एक संधी देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेच्या तारखांची (10th-12th Supplementary Exam Date) मंडळाने घोषणा केली आहे. यानुसार 12 वीची पुरवणी परीक्षा 21 जुलै 2022 पासून सुरु होणार आहे. तर १० वीची पुरवणी परीक्षा 27 जुलै 2022 पासून सुरु होणार आहे. मंडळाने दहावीच्या निकालाची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेतच पुरवणी परीक्षेसंदर्भातली माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ’12 वीच्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा 21 जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा 21 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार आहे. तर १० वीच्या पुरवणी परीक्षा 27 जुलैला सुरू होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत.’ तसंच, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे. तर दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज 20 जूनपासून स्विकारण्यास सुरुवात होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -