पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन : अशी घ्या त्वचेची काळजी

पावसाळा म्हटलं उन्हाळ्यापासून सुटका रिमझिम बरसणाऱ्या सरी ,भिजणारी लहान लहान पोरं, कामावरून परत येताना साचलेल्या पाण्यामुळे झालेल्या ट्रॅफिक जाम , चुकून घरी विसरलेली छत्री रेनकोट या सगळ्याची आपल्याला आठवण येते. आणि या सगळ्यामुळेच आपल्याला पावसाळा कधी हवाहवासा नाहीतर कधी नकोसा होऊन जातो. पण या सगळ्यांमध्ये मला अजून एक गोष्ट अगदी चिटकून बसते. ते म्हणजे फंगल इन्फेक्शन. खरच फंगल इन्फेक्शन म्हणजे काय? त्याच्याने नेमकं काय होतं? खरंच फंगल इन्फेक्शन चा विचार करणं इतका महत्त्वाचा आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण बघू.

मुळातच फंगल इन्फेक्शन म्हणजे त्वचेचा एक रोग. फंगल म्हणजे बुरशी. पांढऱ्या, काळया रंगाच्या बुरशी सहजासहजी बघायला मिळतात. आता यावर्षी कुठेही असू शकतात. हवेत, पाण्यावर, एखाद्या पदार्थावर अगदी त्वचेवर सुद्धा. एखादी गोष्ट खूप काळ तशीच ठेवली की तिला वरती एक थर साचतो. त्यालाच बुरशी म्हणतात. पावसाळ्यात रिमझिम भिजल्यानंतर खूप लोक अंग पुसत नाही अंगावर असलेले कपडे देखील बदलत नाही. अंगातलं पाणी तसेच जिरू देतात. त्यामुळे त्वचेमध्ये ओलसरपणा अधिक जाणवतो. आणि त्या राहिलेल्या पाण्यामुळेच फंगल इन्फेक्शन होते.

फंगल इन्फेक्शनची लक्षणे :-

फंगल इन्फेक्शन हे पावसाळ्यात साठलेल्या ओलाव्यामुळे होतं. आता त्याची लक्षण बघायला गेली. तर अंगाला खाज सुटायला लागते त्याकडे दुर्लक्ष करत नाही तोवर ओली राहिलेली जागा लालसर पडू लागते. छोट्या छोट्या पुळ्या देखील अंगावर होतात. या सर्वांकडे दुर्लक्ष केलं त-हेची इन्फेक्शन हळूहळू शरीरभर पसरायला लागतो. कारण फंगल इन्फेक्शन संसर्गजन्य रोग आहे. टाळू मध्ये फंगल इन्फेक्शनची लक्षणे वेगळी असतात. लहान लहान फोड येणे ,मुरूम, टाळू वरती चिकट थर तयार होतो.

फंगल इन्फेक्शनचे प्रकार :-

पायात रिंग वर्माची समस्या
जागांमध्ये खाज सुटणे
रिंगवर्म

फंगल इन्फेक्शन वरचे उपाय :-
फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी खूप काळ ओलावले मध्ये उभे राहणे टाळावे. ओले मोजे पायात घालू नये. तुम्ही रिमझिम पावसात जरी भिजला तरी पूर्ण अंग स्वच्छ कोरड्या फडक्याने पुसून काढावे. अंगावरचे कपडे बदलावे. बाहेरून घरात आल्यानंतर स्वच्छ पाण्याने हात पाय धुवावे. जेणेकरून बाहेरची धूळ माती लागलेले जंतू धुतले जाते. हवेशीर वातावरणात जास्तीत जास्त काय राहावे.

Join our WhatsApp group