Friday, March 29, 2024
Homeसांगलीसांगली : चोरीप्रकरणी पाच जणांना अटक

सांगली : चोरीप्रकरणी पाच जणांना अटक

कुपवाड एमआयडीसीतील गॅलेक्सी अॅल्युमिनियम एल. एल. पी. या कंपनीचे बंद गोडाऊन फोडून चोरट्यांनी अॅल्युमिनियम लाद्याची चोरी केली होती. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील माल व चारचाकी वाहन, असा 4 लाख 80 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सत्वशील धनंजय पाटील (वय 33), अरुण रमेश गोसावी (वय 27, दोघे रा. शिवशक्तीनगर, कुपवाड), जयवंतकुमार विजयबहाद्दूर यादव (वय 23, रा.दत्तनगर, बामणोली), कुमार भरत गोसावी (वय 41, रा. कोल्हापूर रोड, मिरज), संतोष चंदुमल रोहिडा (वय 30, रा.गांधीनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर नवाब आलम (पूर्ण नाव नाही) व अन्य दोन अनोळखी असे तिघे अद्याप फरारी आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी बुधवार दि.15 जून रोजी मध्यरात्री कुपवाड एमआयडीसीतील गॅलेक्सी अॅल्युमिनियम एल.एल.पी.या कंपनीचे बंद गोडाऊन फोडून चोरट्यांनी 2 लाख 80 हजार रुपये किंमतीच्या 20 किलो वजनाच्या 70 अल्युमिनियम लाद्या चारचाकी (एम.एच.06,ए.झेड.1283) वाहनात भरुन चोरून नेल्या होत्या. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली होती. पोलिसांनी तत्काळ मुख्य संशयित सत्वशील पाटील, अरुण गोसावी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. संशयित पाटील व गोसावी यांनी याकामी अन्य चार मित्रांनी मदत केल्याचे पोलिसांना सांगितले. चोरीतील माल गांधीनगर येथील एका व्यापाऱ्याला विकल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गांधीनगर येथील व्यापाऱ्यांच्या दुकानावर छापा टाकला. तेथे चोरीतील माल दुकानात मिळून आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -