Thursday, April 18, 2024
Homeसांगलीसांगली : शाळकरी मुलास काठीने बेदम मारहाण

सांगली : शाळकरी मुलास काठीने बेदम मारहाण

सांगली येथील वांगीकर प्लॉटमधील अरमान रमजान मोमीन (वय 11) या शाळकरी मुलाला काठीने बेदम मारहाण करण्यात आली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुस्तफा समलेवाले (रा. वडर कॉलनी) व तौफीक अत्तार (वांगीकर प्लॉट) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. अरमान घराजवळ खेळत होता.

त्यावेळी संशयित त्याच्याजवळ गेले. कोणतेही कारण नसताना त्यांनी अरमानला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. परिसरातील लोकांनी अरमानला सोडविले. त्यानंतर त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा पोलिसांनी अरमानचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर त्याचे वडील रमजान सलीम मोमीन (वय 33) यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला. मोमीन हे सेंट्रिंग काम करतात. अरमानला मारहाण करणाऱ्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी तेथील लोकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -