देशात गेल्या 24 तासांत 8,309 नवीन कोरोना रुग्ण, 236 मृत्यू; उत्तराखंड सीमेवर पर्यटकांसाठी RT-PCR आवश्यक

भारतात गेल्या 24 तासात 8,309 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर या काळात 236 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, प्रशासन कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबाबत पूर्ण खबरदारी घेत आहे. राज्याच्या सीमेवर उत्तराखंडमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य असेल.

वृंदावनमध्ये तीन परदेशी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह
उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन या धार्मिक शहरात रविवारी तीन परदेशी नागरिक कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले.परत जाण्यासाठी त्यांनी फ्लाइटमध्ये दाखवण्यासाठी कोविड-19 टेस्ट केली होती, जी पॉझिटिव्ह आढळली. त्यापैकी एकाची टेस्ट शनिवारी पॉझिटिव्ह आली तर इतर दोघांचे अहवाल रविवारी आले. तिघांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, हे तिघे कोणत्या देशाचे नागरिक आहेत, हे अधिकाऱ्यांना सांगता आले नाही. या तिघांच्या संपर्कात आलेल्या ४४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा जलद प्रतिसाद पथकाचे प्रभारी डॉ. भुदेव सिंह यांनी दिली.

Open chat
Join our WhatsApp group