TATA चा मोठा निर्णय, ‘या’ 3 राज्यांमध्ये प्लांट उभारण्याची तयारी

टाटा समूह सॉफ्टवेअरच्या बाबतीत खूप मजबूत आहे. पण आता त्याला हार्डवेअरमध्येही आपले स्थान मजबूत करायचेय. पुढील वर्षाच्या अखेरीस समूहाच्या कारखान्यांमध्ये काम सुरू होऊ शकते. यामध्ये 4000 लोकांना रोजगार मिळू शकतो. सेमी कंडक्टरच्या कमतरतेची समस्या जगातील सर्व मोठ्या वाहन कंपन्यांना भेडसावत आहे.

असेंब्ली प्लांट उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक करणार

टाटा समूह सेमीकंडक्टर असेंब्ली प्लांट उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक करू शकतो. देशातील तीन राज्यांमध्ये सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी युनिट्स स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, कंपनी 2250 कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकते.

Open chat
Join our WhatsApp group