ओमिक्रॉन तब्बल 6 पट बलशाली, त्याची कोणती आहेत लक्षणे, घ्या जाणून…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

एक अतिशय महत्त्वाची आणि आपल्या आरोग्याशी निगडीत अशी बातमी. कोरोनाचा ओमिक्रॉन हा विषाणू डेल्टापेक्षा तब्बल 6 पट बलशाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काहीही त्रास झाला तरी चालेल. सर्व नियमांचे पालन करा. विशेषतः मास्कचा आवर्जुन वापर करा.

कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमिक्रॉन. जगासमोरची सध्याची सर्वात मोठी डोकेदुखी ठरतोय. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या विषाणूची परिणामकारता, संहारकता कैक पटीने जास्त आहे. दक्षिण आफ्रिकेसह इतर देशात त्याच्यावर संशोधन करण्यात आले आहे. त्यानुसार तो डेल्टापेक्षा 6 पट जास्त बलशाली म्हणजे संसर्ग करणारा आहे. विषाणूचा हा प्रकार आपल्या प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालानुसार, हा विषाणू अति संसर्गजन्य आहे. तो लस आणि नैसर्गिक प्रतिकारशस्तीला निष्प्रभ करू शकतो.

दक्षिण आफ्रिकेत सर्वात अगोदर विषाणूचा हा प्रकार ओळखणाऱ्या डॉ. एंजेलीके कोएट्जी बीबीसीशी बोलताना म्हणाले की, मी याची लक्षणे सर्वात अगोदर कमी वयाच्या व्यक्तीत पाहिली. ज्याचे वय 30 वर्षे होते. तो रुग्ण खूप थकलेला असायचा. डोके दुखायचे. पूर्ण शरीरात वेदना व्हायची. त्याचा घसा खवखवायचा. मात्र, त्याला सर्दी वगैरे नव्हती. चव आणि वास ही त्याला ओळखू यायचा नाही. मात्र, थोड्या रुग्णांचे निरीक्षण करून ही लक्षणे सांगितली आहेत. मोठ्या समूहात किंवा अधिक लोकांमध्ये याची लक्षणे नेमकी कशी असतील, याबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही.

Open chat
Join our WhatsApp group