भारतविरुद्ध न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारतविरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी अनिर्णित. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला सामना अखेर अनिर्णित ठरला. टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या 1 विकेटची गरज होती. मात्र डेब्युटंट रचीन रवींद्र आणि अझाज पटेल या दोघांनी केलेल्या चिवट खेळीमुळे सामना अनिर्णित राहिला. टीम इंडियाने न्यूझींलडला विजयासाठी 284 धावांचे आव्हान दिलं होतं. दुसऱ्या डावात न्यूझीलंडनं चौथ्या दिवसखेर 4 धावा करुन 1 विकेट गमावली.

पाचव्या दिवशी किवींना विजयासाठी आणखी 280 धावांची तर टीम इंडियाला 9 विकेट्स गरज होती
टीम इंडियाच्या गोलंदाजांना 9 विकेट्स घेण्यात यश आले. मात्र, शेवटची एक विकेट घेण्यासाठी त्यांना कठोर संघर्ष करावा लागला.
रचीन रवींद्र आणि अझाज पटेल या दोघांनी मैदानात घट्ट पाय रोवले आणि सामना अनिर्णित ठेवला. रचीनने 91 चेंडूत नाबाद 18 धावांची खेळी केली. तर अझाजने 23 बॉलमध्ये 2 धावा केल्या

Open chat
Join our WhatsApp group