Friday, April 19, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर

कोल्हापूर : बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर

बंद घरांच्या दरवाजाला लावलेल्या कुलुपावर कटावणीचा घाला घालत चोरटे हात साफ करू लागलेत. ते सीसीटीव्हीला बगल देत शहरातील मध्यवस्तीसह जिल्ह्यात धाडस दाखवू लागलेत.

पावसाळ्यात २०१९ व २०२१ मध्ये महापूर आला होता. घरात पाणी आल्याने अनेकांना स्थलांतरित व्हावे लागले होते.
अशा पुरातील बंद घरे चोरट्यांनी टार्गेट केली होती. यावर्षी पूरपरिस्थिती शहर परिसरात निर्माण झालेली नाही, तरीही बंद घरे, दुकाने आज सुरक्षित आहेत, याची हमी देता येत नाही. कारण गेल्या काही दिवसांत शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरात घरफोडीचे प्रकार वाढले आहेत.

पावसाने पाण्याच्या पातळीवर पोलिसांचे लक्ष आहे. नदी, ओढा, तलावांसह पाणीच्या मार्गावर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात असून, गस्तही सुरू आहे. सेफ सिटीअंतर्गत शहरात ६५ ठिकाणी १६५ सीसीटीव्ही बसविलेत. मुख्य चौकांसह शहरात प्रवेश करणारे सर्व मार्गांवरही या सीसीटीव्हींची नजर आहे. अनेक घरांत आणि संस्था, मंडळांच्या पुढाकारातून गल्लीबोळात सीसीटीव्ही बसविलेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -