Friday, April 19, 2024
Homeतंत्रज्ञानएटीएम कार्ड असणाऱ्यांना लाखोंचा फायदा, लाभ कसा घ्यायचा, वाचा..

एटीएम कार्ड असणाऱ्यांना लाखोंचा फायदा, लाभ कसा घ्यायचा, वाचा..

पैसे म्हणजे लोकांच्या देवाण घेवाणी, खरेदी विक्री करण्यासाठी महत्वाचे आहेत. आपल्याला पैसे दिल्याशिवाय कोणतीही वस्तू विकत घेता येत नाही. हेच पैसे आपण बँकमध्ये खाते उघडून बहुतेक वेळा ATM Card म्हणजेच डेबिट कार्डने (Debit Card) आपण कॅश गरजेवेळी एटीएम मशिनमधून काढत असतो. सध्या एटीएम कार्डमुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे.

पण तुम्हाला माहीती आहे का, तुम्ही वापरत असलेल्या एटीएम कार्डवर कित्येक लाखांचा फायदा तुम्हाला मिळत असतो. डेबिट कार्डचा उपयोग फक्त पैसे काढणे, ऑनलाईन शॉपिंग व दुकाने, मॉल येथे स्वाईप करून खरेदी करणे, एवढंच नाहीये. तर एटीएम कार्डसह अपघात विमा देखील तुम्हाला काही कार्ड्सवर मोफत उपलब्ध आहे. हे तुम्हाला माहित असायला हवं.

एटीएम कार्डसोबत तुम्हाला विनामूल्य अपघात विमा (Accidental Insurance) मिळतो. तुमच्याकडे कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेचे एटीएम असेल तर तुम्हाला आपोआप अपघात विमा दिला जातो. हा विमा 25 हजार रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर ज्यांना माहीत आहे अशा लोकांना विचारा किंवा ऑनलाईन सर्च करून माहीती मिळवा म्हणजे विम्याचा दावा करण्यास तुम्ही सक्षम बनाल.

कोणत्या कार्डवर किती रक्कम?

तुमच्या बँक अकाउंटच्या प्रकारानुसार आणि एटीएम कार्डच्या काही श्रेणीनुसार ही विम्याची रक्कम ठरलेली असते. यानुसार क्लासिक कार्डवर 1 लाख रुपये, प्लॅटिनम कार्डवर 2 लाख रुपये, नॉर्मल मास्टर कार्डवर 50 हजार रुपये, प्लॅटिनम मास्टर कार्डवर 5 लाख रुपये आणि व्हिसा कार्डवर 1.5 ते 2 लाख रुपये. याशिवाय महत्वाचं म्हणजे प्रधानमंत्री जन-धन खात्यांवर उपलब्ध असलेल्या RuPay कार्डसह, ग्राहकांना 1 ते 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते. कोणत्या बँकेचं कार्ड आहे यावर ही रक्कम 10-20 लाखांपर्यंतही जाऊ शकते.

अपघात विम्यासाठी दावा: जर विमा संरक्षण असलेल्या कोणत्याही एटीएम कार्डधारकाचा जर अपघाती मृत्यू झाला तर एटीएम कार्डधारकाच्या नॉमिनीला सदर व्यक्तीचे बँक खाते ज्या बँकेत असेल, त्या बँकेत नुकसान भरपाईसाठी एक अर्ज होईल तितक्या लवकर सादर करावा लागेल. बँकेत आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर, नॉमिनीला विम्याचा दावा मिळतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संबंधित व्यक्तीचा मृत्यू किंवा अपघात झाला तर विमा पॉलिसीच्या माध्यमातून नुकसान भरपाईचा दावा करण्यापूर्वी तुम्हाला मिळणारे कार्ड व बँक, त्यावरील विमा संरक्षण रक्कम आणि लाभ मिळण्याचा कालावधी इ. सविस्तर माहीती देखील घ्या. कारण यामध्ये बँकांच्या नियमानुसार बदल होण्याची शक्यता असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -