Friday, March 29, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : जुगार अड्ड्यावर छापा; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : जुगार अड्ड्यावर छापा; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दाजीपूर अभयारण्याजवळील ओलवण येथील ऋषिकेश होम स्टे रिसॉर्टवरील जुगार अड्ड्यावर राधानगरी पोलीसांनी छापा टाकला. या छाप्यात ११ लाख ७ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सतरा जणांवर मुंबई जुगार कायद्यातर्गत कारवाई करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ओलवण येथील विलास तुकाराम पाटील यांच्या मालकीचे ऋषिकेश होम स्टे रिसॉर्टमध्ये
जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती राधानगरी पोलीसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक आप्पासो कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नजीर खान पोहेकॉ. बी. डी. पाटील, के. डी. लोकरे, पोना. सचिन पारखे, रोहीत खाडे, योसेफ गावीत यांच्या पथकाने रात्री याठिकाणी छापा टाकला.

महेश जोशी (मालवण), महेश गांधी (कणकवली), शरद गुरव (खारेपाटण), दत्ता वाघमारे (कणकवली), किशोर सावंत (फोंडा घाट), अनिल सिलकर (कणकवली), संदीप राणे, जयवंत बाईत, निलेश हेरेकर (सिंधुदुर्ग), रामचंद्र धुरसोळे, सुधीर गांधी (खारेपाटण), दिनेश जैतापकर (राजापूर), अलपेश गांधी, प्रकाश साळवी (फोंडा), विशाल मोहिते (मालवण), विनायक शिर्के, मिलिंद कुबडे (फोंडा) यांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ११ लाख ७ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रोख रक्कमेसह मोबाईल, चार गाड्याचा समावेश आहे.

अभयारण्यातील ओलवणमधील ऋषिकेश रिसॉर्टवर चार पोलीस छापा टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी याठिकाणी १७ जण जुगार खेळताना सापडले. जिल्ह्याबाहेरील जुगार खेळणाऱ्याना ताब्यात घेताना पोलिसांना मात्र, मोठी कसरत करावी लागली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -