उद्यापासून बदलणार या सरकारी बँकेतील व्यवहार, 2 कोटी ग्राहकांचे व्यवहार होणार एकदम सुरक्षित

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जर तुमचं बँक खातं बँक ऑफ बडोदामध्ये (BOB) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उद्यापासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून बँक ऑफ बडोद्यामध्ये धनादेश तपासणीबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. ही सरकारी बँक ग्राहकांना धनादेश वटल्यावर 1 ऑगस्टपासून सकारात्मक वेतन प्रणाली ल करणार आहे. पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या धनादेशातील महत्त्वाच्या माहितीचा बँक धनादेश वटण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पडताळा घेणार आहे.


ही सुविधा ग्राहकांच्या हितासाठी असून यामुळे धनादेश फसवणुकीच्या अनेक प्रकारांना आता आळा घालता येणार असून ग्राहकांची फसवणूक टळणार आहे. विशेष म्हणजे ग्राहक फसवणुकीपूर्वीच या पद्धतीचा वापर करुन बँकेला धनादेशातील रक्कम न देण्याचे कळवू शकतो. त्यामुळे वेळेवर होणारी धांदल उडणार नाही आणि सुरक्षित व्यवहार होईल.

Join our WhatsApp group