कोल्हापूरचा राजा! यंदाचा लूक वेगळाच, उद्या कोल्हापुरात आगमन : कोल्हापूरच्या राजाचे फोटो पहा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गणेशोत्सव जवळ आला कि सर्वाना वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे. मोठा उत्साहात व थाटामाटात हा सण साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आनंदावर मर्यादा आल्या होत्या. मात्र यंदा हा गणेशोत्सव मोठ्या धुमधाकड्यात साजरा होणाराय… त्यातच कोल्हापूरच्या राजाचे आगमन उद्या (१ ऑगष्ट) रोजी होणार असून, सर्वात आधी यंदा या राजाचा लूक पाहायला मिळतोय. यंदा कोल्हापूरच्या राजाचा लूक जरा हटके असून तुम्हाला तो बैठी स्वरूपात पाहायला मिळणार आहे.


मुंबईच्या लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीचे दर्शन पश्चिम महाराष्ट्र, कोकण व गोव्यातील भाविकांना घेता यावे रंकाळवेस गोल सर्कल मित्र मंडळाला कोल्हापूरच्या राजाची मूर्ती बसविण्यास सुरवात केली. त्यामुळे रंकाळावेस गोल सर्कल मित्र मंडळाची यंदाची बाप्पाची मूर्ती म्हणजेच कोल्हापूरच्या राजाची मूर्ती यंदा बैठी स्वरूपाची असून मागे गरुड पंख आहे. सर्वात आधी कोल्हापूरच्या राजाचे फोटो ताजी बातमी वर आपल्याला पाहायला मिळत आहेत.

Join our WhatsApp group