युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची तोफ उद्या कोल्हापुरात धडाडणार, कोल्हापुरात सभा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवसेनेतील बंडाळीनंतर युवासेना
प्रमुख आदित्य ठाकरे यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. सोमवारी १ ऑगष्ट रोजी ते दुपारनंतर कोल्हापूर जिल्ह्यात येत असून सायंकाळी त्यांची तोफ आजरा व कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे धडाडणार आहे. दुपारी ३ वाजता आजऱ्यातील धर्मवीर संभाजी चौकात आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपाजिल्हा संघटक संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, राजेंद्र सावंत यांनी दिली.
शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायऊतार व्हावे लागले.राज्यात सध्या एकनाथ शिंदे यांचे सरकार आहे. येथील स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर शिंदे यांच्यासोबत राहीले. त्यामुळे आजरा तालुका शिवसेनेच्यावतीने आबिटकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून आबिटकर यांच्या निषेध केला होता. त्यांच्या फोटोला काळे फासले होते. राज्यात शिवसेनेत बंडाळी होऊन अनेकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात प्रवेश केला. पण आजरा तालुक्यातील शिवसेना मातोश्रीशी एकनिष्ठ राहीली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या आजरयात होणारया सभेला महत्व प्राप्त झाले आहे.

Join our WhatsApp group