भारतात याच महिन्यात सुरू होणार 5G सेवा, Airtel ने अधिकृतपणे दिली माहिती

5G स्पेक्ट्रमचा लिलाव संपल्यानंतर 5G सेवा (5G service) कधी सुरू होणार याची प्रत्येक भारतीयांना उत्सुक आहे. काही दिवसांपूर्वी Jio ने या 15 ऑगस्ट रोजी 5G सेवा लॉन्च करण्याचे संकेत दिले होते. त्यानतंर आता एअरटेलने (Airtel) देखील याच महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये भारतात 5G सेवा सुरू करणार असल्याचे अधिकृतपणे सांगितले आहे. एअरटेलने अधिकृतपणे ऑगस्ट 2022 मध्ये आपली 5G सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. एअरटेल कंपनीने भारतात 5G सेवा सुरू करण्यासाठी Ericssion, Nokia आणि Samsung सोबत भागीदारी केली आहे. या तीन कंपन्यांसोबत मिळून एअरटेल देशात 5G च्या विस्तारावर काम करणार आहे. ही सेवा कधी सुरू होणार त्याच्या तारखेचा खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल देखील 15 ऑगस्ट रोजी आपली 5G सेवा देखील सुरू करेल असे मानले जात आहे.

लिलावात कोणी किती कोटींची बोली लावली?
नुकताच 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला आहे. या लिलावात एकूण 72,098 MHz स्पेक्ट्रम ऑफर करण्यात आले होते. यातील 51,236 MHz विकले गेले आहेत. या लिलावात एकूण 1,50,173 रुपयांची बोली लावण्यात आली आणि त्यात जिओने बाजी मारली आहे. रिलायन्स जिओने सर्वाधिक 88,078 कोटी रुपयांची बोली लावली. तर त्यापाठोपाठ भारती एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. एअरटेलने 43,084 कोटी रुपयांची बोली लावली, तर तिसऱ्या क्रमांकावरील वोडाफोन आयडियाने 18,799 कोटी रुपयांची बोली लावली होती.

कोणाला किती स्पेक्ट्रम मिळाले?

Reliance Jio: 24,740 MHz (700 MHz, 800 MHz, 1800 MHz, 3300 MHz और 26 GHz)
Bharti Airtel: 19,867 MHz (900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 3300 MHz और 26 GHz)
Vodafone Idea: 6228 MHz (1800 MHz, 2100 MHz, 2500 MHz, 3300 MHz और 26 GHz)
Adani: 400 MHz (in 26 GHz)

एअरटेल जिओला टक्कर देणार

Airtel च्या आधी Jio कंपनीने 15 ऑगस्टला भारतात 5G सेवा सुरू करणार असल्याचे संकेत दिले आहेत. जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी नुकतेच सांगितले की ‘आम्ही आझादीचा अमृत महोत्सव देशभरात 5G सुरू करून साजरा करू. जिओ देशात परवडणाऱ्या जागतिक दर्जाच्या 5G आणि 5G सक्षम सेवेसाठी वचनबद्ध आहे.

Join our WhatsApp group