Wednesday, April 17, 2024
HomeमनोरंजनKajol Birthday: वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी काजोल झाली 48...

Kajol Birthday: वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी काजोल झाली 48 वर्षांची, मराठीशी आहे खास नातं!

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री काजोल (Kajol) आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने तिने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. इतकेच नाही तर ती नव्वदच्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी (Actress) एक आहे. काजोलने अनेक पुरस्कार आणि अवॉर्ड्सही जिंकली आहेत. अभिनेत्रीचा जन्म 5 ऑगस्ट 1974 रोजी मुंबईत तनुजा मुखर्जी (Tanuja mukherjee) आणि शोमू मुखर्जी (Shomu Mukherjee) यांच्या घरी झाला. काजोल एका फिल्मी कुटुंबातील आहे. अभिनेत्रीचे दिवंगत वडील शोमू मुखर्जी हे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक होते. तिची आई तनुजा या देखील अभिनेत्री होत्या.

काजोलचं मराठीशी आहे खास नातं

अभिनेत्री काजोलचं मराठीशी खास नातं आहे. ती मराठीमधूनही चांगला संवाध साधते. यामागचे कारण म्हणजे, काजोलची आई तनुजा या मराठी होत्या. तर वडील हे बंगाली होते. काजोलच्या आजी शोभना समर्थ या देखील मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. यामुळे काजोलच्या घरामध्ये देखील मराठी भाषा बोलली जात होती. यामुळे बालपणापासूनच तिला मराठी भाषा आवडायला लागली.

अशी आहे अजय-काजोलची लव्हस्टोरी

ऑनस्क्रीन लोकांना शाहरुख खानसोबत काजोलची जोडी आवडते. पण खऱ्या आयुष्यात लोक अजय आणि काजोलच्या जोडीची उदाहरणे देतात. 24 फेब्रुवारी 1999 रोजी दोघांचे लग्न झाले. दोघांची पहिली भेट ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. विनोदी स्वभावाच्या काजोलला सेटवर मजाक-मस्ती करणे आणि बोलणे खूप आवडायचे. दुसरीकडे अजय देवगण शांत स्वभावाचा होता. त्यावेळी काजोलचा स्वभाव त्याला आवडला नव्हता. मात्र नंतर ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. काजोलचे लग्न झाले तेव्हा ती बॉलिवूडच्या टॉप हिरोईनपैकी एक होती. त्याचवेळी अजय देवगणचा पहिला चित्रपट हिट ठरला होता. काजोलने 24 व्या वर्षी अजय देवगणसोबत लग्न केले. आता या कपलला दोन मुले मुलगी न्यासा आणि मुलगा युग हे आहेत.

16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पाऊल

काजोल आज तिचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. काजोलने वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. तिचा पहिला बॉलिवूड डेब्यू चित्रपट ‘बेखुदी’ आहे. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नंतर 1993 मध्ये, काजोल अब्बास मस्तान यांच्या बाजीगर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला. हा चित्रपट चांगलाच हिट ठरला. त्यानंतर 1995 मध्ये काजोल ‘करण-अर्जुन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सिनेमांमध्ये बॅक टू बॅक दिसली.

त्यांचे दोन्ही चित्रपट हिट ठरले. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील अभिनयासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. काजोल बॉलिवूड चित्रपट ‘गुप्त’मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसली होती.

या चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना चांगलीच आवडली होती. या चित्रपटासाठी काजोलला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेचा पुरस्कार मिळाला होता. यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. ज्यात ‘होते होते प्यार हो गया’, ‘उधार की जिंदगी’, ‘गुंडाराज’, ‘हलचल’, ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हेलीकॉप्टर’, ‘फना’, ‘माय नेम इज खान’, ‘त्रिभंगा’, ‘ये दिल्लगी’, ‘ओम शांति ओम’, ‘प्यार तो होना ही था’, ‘दुश्मन’, ‘दिलवाले’ और ‘कुछ कुछ होता है’ यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -