Friday, March 29, 2024
Homeब्रेकिंगराज्यात ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, वाचा हवामान विभागाची मोठी अपडेट..

राज्यात ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, वाचा हवामान विभागाची मोठी अपडेट..

आज हवामान खात्याने महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याचं समजतंय. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस बरसला. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. आता आजपासून पुढील 3 ते 4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पुढील 3 ते 4 दिवसांत पालघर, ठाणे, मुंबई, धुळे नंदूरबार, जळगाव, नांदेड, नगर, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 6 ऑगस्ट आणि 7 ऑगस्टला कोकणातील काही भागांत जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर किनापट्टी भागावर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग नाशिक, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. तर पुणे आणि आसपासच्या भागांमध्ये
आज व उद्या आकाश काही प्रमाणात ढगाळ राहण्याची आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने नुकतीच हजेरी लावली असून काही भागांत काही वेळेपुरता मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -