Thursday, March 28, 2024
Homeबिजनेसबिटकॉईन 23,000 डॉलरच्या पुढे तर Ether ही तेजीत, आभासी चलन आठवड्याच्या सुरुवातीला...

बिटकॉईन 23,000 डॉलरच्या पुढे तर Ether ही तेजीत, आभासी चलन आठवड्याच्या सुरुवातीला सुसाट

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी क्रिप्टो मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency market) असलेला बिटकॉइन 23000 डॉलरच्या वर व्यापार करत होता. आज बिटकॉइनने 1 टक्क्याच्या वाढीसह 23,287 डॉलरवर व्यापार केला. 2022 च्या सुरुवातीपासून बिटकॉइनमध्ये 55 टक्के घसरण झाली होती. तरुण गुंतवणूकदारांचे यंदा या आभासी चलनाने तोंडचे पाणी पळवले होते. कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीमुळे अनेकांनी या चलनातील व्यापाराकडे पाठ फिरवली होती.

शेअर मार्केटपेक्षा ही मोठे नुकसान यंदा क्रिप्टो करन्सीमध्ये झाले. मात्र, गेल्या काही महिन्यांत बिटकॉइनचा (Cryptocurrency market) व्यवहार 19 हजार डॉलर ते 24 हजार डॉलरच्या घरात झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत एक्सआरपी, सोलाना, बीएनबी, लाइटकॉइन, चेनलिंक , टेथर , पोल्काडोट, ट्रॉन, अॅव्हॅलन्चे , स्टेलर, अॅपेकॉइन, युनिस्वॅप, पॉलिगॉन या शेअरमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या आभासी चलनाकडे गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून तरुणाईचा विश्वास वाढल्याचे दिसून आले.

ईथरचे बिटकॉनच्या पाऊलावर पाऊल
तज्ज्ञांच्या मते, बिटकॉइनने 23 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. तसेच त्याला गुंतवणूकदारांचा सपोर्ट मिळत आहे. सध्या बिटकॉइनला 23,000 डॉलरच्या दरम्यान सपोर्ट मिळत असल्याने तो लवकरच 24,000 डॉलरचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. आता ईथरनेही (Ether) नवी झेप घेतली असून या चलनाने 1700 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी असलेल्या ईथरमध्ये 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. हे चलन सध्या 1,713 डॉलर्सवर व्यापार करत आहे. क्रिप्टो मार्केटमधील तेजीत ईथर 1,700 डॉलर वर पोहचला आहे.

शीबा इनू आणि डोजकॉइन
शीबामध्ये इनू 2 टक्क्यांनी वधारला आणि तो 0.0012 डॉलरवर व्यापार करत आहे. डोजकॉइन(Dogecoin) मध्येही 2 टक्क्यांची वाढ झाली आणि तो 0.06 डॉलरवर पोहचला आहे.

तर इतर क्रिप्टोजची स्थिती अशी आहे
गेल्या 24 तासांत एक्सआरपी(XRP), सोलाना(Solana), बीएनबी(BNB), लाइटकॉइन(Litecoin), चेनलिंक (Chain-link), टेथर (Tether), पोल्काडोट(Polka dot), ट्रॉन(Tron), अॅव्हॅलन्चे (Avalanche), स्टेलर, अॅपेकॉइन, युनिस्वॅप, पॉलिगॉन या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -