Tuesday, April 16, 2024
HomeमनोरंजनRashmika Mandana : रश्मिका मंदानाच्या अफेअरबाबत सलमानने केला मोठा खुलासा

Rashmika Mandana : रश्मिका मंदानाच्या अफेअरबाबत सलमानने केला मोठा खुलासा

साऊथचा सुपर स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सध्या त्याचा आगामी चित्रपट लाइगर (Liger) वरून चर्चेत आहे. नुकताच लाइगरचा ट्रेलर रिलिज झाला होता. त्यामुळे त्याने चाहत्यांकडून भरभरून प्रशंसा देखील मिळवली. याशिवाय विजय देवरकोंडा त्याची त्याच्या पर्सनल लाइफवरून देखील चर्चा होत आृहे. विजय आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिच्या अफेअरबाबत अक्षरशः चर्चेला ऊत आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसीर, रश्मिका आणि विजय काही महिन्यांपूर्वी एकमेंकाना डेट करत होते. नंतर दोघांमध्ये ब्रेकअप झाला. आता रश्मिका आणि विजयच्या अफेअरबाबत अभिनेता दुलकर सलमान (Dulquer Salmaan) याने मोठा खुलासा केला आहे. दुलकर सलमान हा रश्मिका आणि विजयचा जवळचा मित्र आहे.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना दोघे गेल्या काही महिन्यांपूर्वी डेट करत होते. दोन वर्षांपूर्वी दोघांमध्ये ब्रेकअप झालं. याबाबत दुलकर सलमान याला प्रश्न करण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, याबाबत मला काही माहित नाही. कोण कोणाला डेट करतो आहे, कुणाचं ब्रेकअप झालं, हे विचारत बसणार मी मित्र नाही. मी त्या दोघांना असं कधीच पाहिलं नाही. परंतु मला त्या दोघांची जोडी आवडते.ते दोघेही माझ्याजवळ या मुद्द्यावर कधीही बोलले नाही. परंतु त्यांचे चाहते त्यांच्या स्पष्टीकरणाच्या प्रतिक्षेत आहेत.

रश्मिका मंदाना आणि दुलकर सलमान यांची नवा तेलगू चित्रपट ‘सीता रमण’ 5 ऑगस्टला रिलीज झाला. या चित्रपटात मृणाल ठाकूर देखील प्रमुख भूमिकेत दिसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -