Friday, March 29, 2024
Homeसांगलीसांगली : राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा मुदतपूर्व राजीनामा!

सांगली : राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा मुदतपूर्व राजीनामा!



सांगली; स्थायी समितीतील राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांचा मुदतपूर्व राजीनामा होणार असल्याचे स्पष्ट संकेत पक्षातून देण्यात आले. स्थायीत नवीन 10 सदस्यांची निवड दि. 19 रोजीच्या महासभेत होईल. स्थायी समिती सभापती व सदस्य निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

स्थायी समिती सभापतींचा कार्यकाल 1 वर्षाचा, तर स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाल 2 वर्षांचा असतो. स्थायी समितीतील 8 सदस्यांची दोन वर्षांची मुदत दि. 31 ऑगस्टअखेर संपत आहे. यामध्ये भाजपच्या सविता मदने, सुनंदा राऊत, अनिता व्हनखंडे, गायत्री कल्लोळी, संजय यमगर यांचा समावेश आहे. काँग्रेसचे करण जामदार व पद्मश्री पाटील यांचीही मुदत संपत आहे. राष्ट्रवादीचे मनगू सरगर यांची मुदत दि. 31 ऑगस्ट रोजी संपणार आहे.

राष्ट्रवादीच्या स्थायी समिती सदस्या संगीता हारगे व नर्गीस सय्यद यांच्या निवडीस 1 वर्ष झालेले आहे. मात्र पक्षातील उर्वरीत नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यपदाची संधी देण्यासाठी हारगे व सय्यद यांचा पक्षाकडून मुदतपूर्व राजीनामा घेतला जाईल, असे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे स्थायी समितीमधील राष्ट्रवादीच्या 3 जागा रिक्त होतील. राष्ट्रवादीकडून नवीन 3 सदस्य निवडीसाठी अतहर नायकवडी, पवित्रा केरिपाळे व स्वाती पारधी यांचे नाव चर्चेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -