Friday, April 19, 2024
Homeराजकीय घडामोडीBihar Political Crisis : बिहारमध्ये राजकीय भूकंप! नितीशकुमार सरकार कोसळलं; भाजपच्याही 16...

Bihar Political Crisis : बिहारमध्ये राजकीय भूकंप! नितीशकुमार सरकार कोसळलं; भाजपच्याही 16 मंत्र्यांचा राजीनामा

बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप आला. त्यातच नितीशकुमार सरकार (Bihar news) कोसळले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Cm Nitishkumar) यांनी भाजपपासून फारकत घेतल्याचे अधिकृतपणे जाहीर केलं आहे. राज्यपाल फग्गु चौहान यांची भेट घेवून नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ भाजपच्या 16 मंत्र्यांनी राजीनामा दिला. नितीशकुमार (Bihar Breaking news) आता लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करणार असल्याचे समजते.

रिपोर्ट्सनुसार,नितीश कुमार हे नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असतील तर तेजस्वी यादव हे नवे उपमुख्यमंत्री असतील. तसेच खातेवाटपाचे सर्व अधिकार हे नितीशकुमार यांच्याकडेच असतील, असा फॉर्म्युला निश्चित ठरला आहे. तर विधानसभा अध्यक्ष तेजस्वी यादव यांच्या राजदचाच असेल.

बिहारमध्ये (Bihar) जदयू (JDU) आणि भाजपची (BJP) युती तुटली आहे. जनता दल युनायटेडच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नितीशकुमार मंगळवारी दुपारी 4 वाजता राज्यपालांची भेट घेवून राजीनामा सोपवला. नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडून राजदसोबत (RJD) आघाडी करणार असल्याचे निश्चित झाल्याचे समजते. नितीश कुमार राजद, काँग्रेस आणि डाव्यांसह नवीन सरकार बनवू शकतात, अशीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाच्या आमदारांची मंगळवारी महत्त्वची बैठक घेतली. या बैठकीत भाजपसोबत असलेली युती तोडण्याच्या निर्णयावर चर्चा झाल्याचे समजते. विशेष म्हणजे भाजपसोबत काडीमोड घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तंब झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे, भाजपच्या गोटात देखील राजकीय हलचालींना वेग आला आहे. सरकारमध्ये असलेले भाजपनेते थोड्याच वेळात राजीनामा देण्याची शक्यता आहे. भाजप नेते यासंदर्भात दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार आहे.

दुसरीकडे, राजदचे नेतृत्व करणारे तेजस्वी यादव यांना नव्या सरकारमध्ये गृहमंत्रिपद हवे असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी नितीशकुमार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत गृहमंत्रिपदाची मागणी केल्याचे समजते. दरम्यान, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात सध्या मंत्रिपदाच्या वाटाघाटी सुरू आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -