Friday, March 29, 2024
Homeतंत्रज्ञान2022 Hyundai Tucson SUV भारतात लाँच, जबरदस्त आहेत फीचर्स, जाणून घ्या किंमत

2022 Hyundai Tucson SUV भारतात लाँच, जबरदस्त आहेत फीचर्स, जाणून घ्या किंमत



Hyundai ने आज भारतात आपली फ्लॅगशिप SUV Hyundai Tucson लॉन्च केली आहे. भारतात नवीन Hyundai Tucson SUV ची एक्स-शोरूम किंमत 27.69 लाख रुपयांपासून सुरू होते. ही SUV आत्ता 50,000 रुपयांच्या सुरुवातीच्या रकमेत बुकिंगसाठी उपलब्ध आहे. 2022 Hyundai Tucson प्लॅटिनम आणि सिग्नेचर या दोन ट्रिममध्ये ऑफर केली जाईल. ग्राहकांना 5 मोनोटोन आणि 2 ड्युअल टोन कलर व्हेरियंटमधून आपली गाडी निवडू शकतात. ही फोर्थ जनरेशन Hyundai Tucson आहे आणि ती आंतरराष्ट्रीय पातळीवर आधीच लॉन्च करण्यात आली आहे. 2022 Hyundai Tucson हे Hyundai Motor India चे प्रमुख उत्पादन आहे. तसेच Hyundai Venue कॉम्पॅक्ट SUV नंतर कंपनीकडून या वर्षी लाँच होणारी ही दुसरी SUV आहे. नवीन 2022 Hyundai Tucson SUV बद्दल इतर तपशील जाणून घेऊया…

चौथ्या पिढीतील Tucson SUV मध्ये भविष्यकालीन आणि अत्याधुनिक डिझाइन असेल. नवीन-जनरल Hyundai Tucson ची टक्कर Citroen C5 Aircross, Jeep Compass, आणि Volkswagen Tiguan या गाड्यांशी असेल. ही SUV 2.0 लिटर पेट्रोल आणि डिझेल अशा दोन पॉवरट्रेन ऑफ्शनमध्ये उपलब्ध असेल. ट्रान्समिशन ऑप्शन 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स (पेट्रोलवर) आणि 8-स्पीड ऑटोमॅटिक (डिझेलवर) असतील. तसेच ही कार ऑल-व्हील-ड्राइव्ह मोडसह ऑफर केली जाईल. 2022 Hyundai Tucson’s Level 2 ADAS मध्ये 19 सुरक्षा प्रणाली आहेत जे फ्रंट आणि बॅक रडार आणि कॅमेरा पेरिफेरल्सच्या सेटवर अवलंबून आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -