Friday, March 29, 2024
Homeजरा हटकेमुलाच्या मृत्यूनंतर श्रीमंत दगडूशेठ यांनी स्थापन केली होती गणेशाची मूर्ती, आज जगभरात...

मुलाच्या मृत्यूनंतर श्रीमंत दगडूशेठ यांनी स्थापन केली होती गणेशाची मूर्ती, आज जगभरात आहे प्रसिद्ध!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्यासोबतच (Pune news)जगभरात हा बाप्पा प्रसिद्ध आहे. या बाप्पाच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात. संपूर्ण जगात आपली किर्ती पोहोचवणाऱ्या गणपतीच्या स्थापनेची एक वेगळी कथा आहे. यासोबतच सामाजिक बांधिकली जपणारे मंडळ म्हणूनही हे प्रसिद्ध आहे. या मंडळाचा इतिहास आणि वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत.

व्यापारी होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई
श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातील बुधवार पेठेतच ते राहत होते. या काळात पुण्यात प्लेगची साथ आली. या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाने जीव गमावला. या घटमुळे ते आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे पूर्णपणे कोलमडले. त्यावेळी त्यांचे गुरू माधवनाथ महाराजांनी दगडूशेठ यांना आधार दिला. यासोबतच त्यांना दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करुन त्याची पूजा करण्याचा सल्ला दिला. हेच दोघं भविष्यात अपत्य जसे आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करते, त्याच प्रमाणे हे दैवत तुमचे नाव उज्ज्वल करतील असेल सांगितले.

टिळकांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा
आपल्या गुरुंचा सल्ला ऐकूण दगडूशेठ यांनी दत्ताची एक एक संगमरवरी मूर्ती तयार केली. तसेच गणपतीची मातीची मुर्ती तयार करुन घेतली. या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई अशा अनेकांची हजेरी होती. गणरायाची पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरामध्ये आजही आहे.

1896 साली तयार केली दुसरी मूर्ती
1894 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणोशोत्सवाला सुरुवात केली. यानंतर मोठ्या उत्साहात दरवर्षी गणेशोत्सव साजरा होऊ लागला. दरम्यान 1896 मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली. या गणपतीचा मोठा उत्सव होऊ लागला. दगडूशेठ हलवाई यांनी सुरु केलेली गणेशोत्सवाची परंपरा येथील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी कायम ठेवली. यानंतर सुवर्णयुग तरुण मंडळाने नंतर दगडूशेठच्या गणपतीची जबाबदारी घेतली. 1896 मध्ये तयार करण्यात आलेली मूर्ती ही जीर्ण झाली होती. यानंतर 1867 मध्ये नवीन मूर्ती तयार करण्यात आली. ही मूर्ती अत्यंत सुबक अशी आहे. आजही याच मूर्तीची पूजा केली जाते.

सामाजिक बांधिलकी जपते मंडळ
दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ सामाजिक बांधिकली जपणारे मंडळ आहे. श्रद्धेपोटी समाजाने दिलेल्या पैशातून सामाजिक कार्य केले जातात. कोणत्याही संकटात हे मंडळ नेहमीच समाजाला मदत करत आले आहे. यासोबतच या ट्रस्टतर्फे गणपती उत्सवाच्या काळात सुंदर विद्युत रोषणाई केली जाते. भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्यातून दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी विविध दागिणे आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -