‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्याच वीकेंडमध्ये केली रेकॉर्डब्रेक कमाई, जमवला इतक्या कोटी रुपयांचा गल्ला!

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भटचा (Alia Bhatt) ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट (Brahmastra Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सलग तीन दिवस या चित्रपटाने जबरदस्त (Brahmastra Box Office Collection) कमाई केली आहे. रविवारी तर या चित्रपटाने खूपच चांगली कमाई केली आहे. अयान मुखर्जीच्या या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 150 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. ब्रह्मास्त्र हा रणबीर कपूरचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. याआधी हा विक्रम ‘संजू’च्या नावावर होता.

रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यावेळी आलिया भट्ट त्याच्यासाठी खूपच लकी ठरली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 75 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी हा आकडा 160 कोटींवर पोहोचला होता. सोशल मीडियावर ब्रह्मास्त्रवर बहिष्कार सुरू आहे. असे असताना देखील चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे.

ब्रह्मास्त्रने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 37 कोटींची कमाई केली. दुस-या दिवशी या कलेक्शनमध्ये वाढ झाली असून शनिवारी या चित्रपटाने 42 कोटींचा गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी ब्रह्मास्त्रने धमाकेदार कमाई केली आणि सर्व भाषांमध्ये 46 कोटींची कमाई केली आणि तिकीट खिडकीवर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. यासोबतच या चित्रपटाने तीन दिवसांत 125 कोटींचा व्यवसाय करून यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

देशभरातील एकूण 125 कोटी रुपयांमध्ये दक्षिण भारतीय डब केलेल्या वर्जनने 16 कोटी रुपयांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक 13 कोटी रुपयांचे कलेक्शन तेलुगु डबमधून झाले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या हिंदी रिलीजने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने 109 ते 110 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह, आतापर्यंतच्या टॉप 5 चित्रपटांच्या वीकेंड कलेक्शनमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे.

Join our WhatsApp group