भारताचे गोलंदाजी आक्रमण किती मजबूत? या 5 मुद्द्यांतून समजून घ्या टीम इंडियाची ताकदपुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघात अपेक्षित असलेल्या जवळपास सर्वच नावांचा समावेश आहे. मात्र विश्वचषकापर्यंत रवींद्र जडेजा तंदुरुस्त असल्याच्या ज्या चर्चा होत्या त्या आता संपुष्टात आल्या आहेत. कारण विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात जडेजाचा समावेश नाही. वर्ल्डकपसाठी भारतीय संघ कसा आहे? कोणाला संधी देण्यात आली आहे आणि भारतीय संघ किती मजबूत आहे या सर्व गोष्टी येथे समजून घेऊया.

टॉप ऑर्डर फलंदाज चांगल्या फॉर्मात
टॉप ऑर्डरबद्दल बोलायचे झाल्यास आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे रन मशीन विराट कोहलीला जुन्या फॉर्ममध्ये परत आला आहे. कोहलीने आशिया कपमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावून आपली फॉर्म दाखवून दिला आहे. केएल राहुल धावा काढण्यासाठी धडपडताना दिसला पण अफगाणिस्तानविरुद्धही त्याने चांगली खेळी केली. त्यामुळेच कर्णधार आणि प्रशिक्षकाचा त्याच्यावर विश्वास आहे. शिवाय सूर्यकुमार यादवही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. खुद्द रोहित शर्मानेही अर्धशतक झळकावले आहे. या तिन्ही वरिष्ठ खेळाडूंना ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे.

बुमराहमुळे वेगवान गोलंदाजी मजबूत
भुवनेश्वर कुमार हा आशिया चषकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. पण सुपर-4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने संघाची वेगवान गोलंदाजी पूर्णपणे उघडी पडली. मात्र विश्वचषकासाठी जसप्रीत बुमराहसोबत हर्षल पटेल संघात पुनरागमन करत आहे. तसेच हार्दिक पांड्याही बॅटसह चेंडूने उपयुक्त योगदान देत आहे. त्यामुळे विश्वचषकात भारतीय संघात एका बाजूने बुमराह आणि भुवनेश्वर कुमारसारखे अनुभवी गोलंदाज असतील, तर दुसऱ्या बाजूने हर्षल पटेल आणि युवा अर्शदीप पर्याय म्हणून उपलब्ध असतील. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजीत पूर्ण खोली दिसून येते. दीपक चहर आणि मोहम्मद शमी यांना स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. या दोघांच्या समावेशानंतर गोलंदाजी विभाग खूपच मजबूत दिसत आहे.

Join our WhatsApp group