Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्र9 वाहनांचा विचित्र अपघात, दोन जण जखमी!

9 वाहनांचा विचित्र अपघात, दोन जण जखमी!

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) सोमवारी विचित्र अपघात झाला. बोरघाटात (Borghat) ही घटना घडली. या विचित्र अपघातामुळे मुंबईकडे (Mumbai) येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. भरधाव वेगाने आलेल्या ट्रकचा ब्रेक फेल (Truck brake failure) झाला. यामुळे नऊ वाहने एकमेकांवर विचित्र प्रकारे धडकल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणाला गंभीर दुखापत देखील झालेली नाही. परंतु, दोन प्रवासी किरकोळ जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दहा वाहनांचे झाले आहे नुकसान
मुंबईच्या दिशेने ट्रक येत होता. दरम्यान या ट्रकचा ढेकू गावाच्या हद्दीतील उतारावर ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे या ट्रकने तब्बल अनेक वाहनांना टक्कर दिली. सर्वात आधी या भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने पुढे जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या घटनेनंतर या कारने एसटी बस आणि इतर सात वाहनांना जोरदार धढक दिली. यात एसटी बसला जोरदार धडक दिल्याने कारचा चुराडा झाला आहे. याचवेळी मागून आलेल्या भरधाव वाहनांनी एकमेकांना धडक दिली. अशा प्रकारे या अपघातात सुमारे दहा वाहनांचे नुकसान झाले आहे.

अपघातामुळे वाहतूक झाली होती विस्कळीत
या विचित्र अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ ही वाहतूक विस्कळीत झालेली होती. हळुहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली. मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावरील आयआरबी, देवदूत यंत्रणा या अपघाताच्या ठिकाण धावून आली. त्यांनीच अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूत सुरळीत झाली. बोरघाट पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात त्यांनी प्रयत्न केले.

सुदैवाने जीवितहानी नाही, दोन प्रवासी जखमी
हा अपघात खूप विचित्र होता. जवळपास दहा वाहनांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. अपघात मोठा असुनही सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. तसेच कुणाला गंभीर दुखापत देखील झालेली नाही. केवळ दोन जण किरकोळ जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सातत्याने अपघात होत असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचा याच मार्गावर अपघात झाला होता. ज्यामध्ये त्यांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. यापूर्वी देखील अनेकांना येथील अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण हे गंभीर जखमी देखील झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -