Thursday, March 28, 2024
Homeब्रेकिंगराज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा!

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा!

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. मात्र आता पावसाने (Rain updates)जोरदार कमबॅक केले आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra)बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणार गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान हा परतीचा पाऊस (Rain)असल्याचे अनेकांना वाटत आहे. पण हा परतीचा पाऊस नाही. आता पुढील 2 दिवस पुण्यासह (Pune Rain) राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच सध्या बरसणारा पाऊस परतीचा नाही अशी माहिती पुणे हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

या सहा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याकडून गुजरात (Gujrat), महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेच्या सुमारास बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होऊ शकते. त्यामुळे ओदिशामध्ये अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच इतर राज्यांमध्येही हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातही जोरदार पाऊस
दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे राज्यात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस बसरणार आहे. तर मराठवाड्यामध्ये देखील आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान पुण्यात रविवारीच सलग तीन-चार तास मुसळधार पाऊस बसरला. यामुळे नारिकांचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवारीही अनेक शहरांमध्ये पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईत मुसळधार पाऊस सुरु
दरम्यान गेल्या तासभरापासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी देखील दिवसभर मुंबईत पावसाच्या रिमझिम पाऊस सुरुच होता. तसेच, मध्यरात्रीही अधुनमधून पावसाच्या सरी बसरतच होत्या. दरम्यान गेल्या तासाभरापासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे पाच वाजेपासून संपूर्ण मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे नागरिकांचे हालही होत आहेत.

मच्छिमारांना पुढचे 2 दिवस अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा
दरम्यान मच्छिमारांना अलर्ट करण्यात आले आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस बरसणार असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हाच धोका लक्षात घेता राज्यातील मच्छिमारांना पुढील काही दिवस मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -