Thursday, March 28, 2024
Homeबिजनेसदेशात ‘या’ 10 कार्सचा धुमाकूळ, कोणती कार विक्रीत ठरली नंबर वन, वाचा..

देशात ‘या’ 10 कार्सचा धुमाकूळ, कोणती कार विक्रीत ठरली नंबर वन, वाचा..

यंदाच्या वर्षातील गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये यूटिलिटी व्हेइकल्स (एसयूव्ही आणि एमयूव्ही) च्या विक्रिमध्ये भरपूर वाढ दिसून आली. देशात हजारो गाडया काही दिवसांत विकल्या जातात, त्यामध्ये मारुती सुझुकी ब्रेझा विषयी जर बोलायचं झालं तर गेल्या महिन्यामध्ये मारुतीची ही कार 15,193 यूनिट विक्रीसह वरच्या क्रमांकावर होती. त्यानंतर इतर कंपनीच्या कार्सचा नंबर लागतो.

अधिक माहीती अशी की, मारुती सुझुकी कंपनीच्या ब्रेझानंतर देशातील नंबर एक कंपनी समजली जाणारी टाटा च्या नेक्सन (Tata Nexon) या कारचा दुसरा नंबर लागतो. या कारने देखील तुफान विक्री केली आहे यामुळे ही कार यापूर्वी ही कार गेली काही महिने टॉपवर होती. पण सुरुवातीला अधिक विक्री होत ऑगस्ट महिन्यामध्ये विक्री केवळ 15,085 यूनिटची विक्री झाली. यामुळे ती दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.

याशिवाय लुक मुळे चर्चेत आलेली एसयूव्ही ह्युंडाई कंपनीची क्रेटा ही कार तिसऱ्या क्रमांकावर आहे. अल्पावधीतच या गाडीने लोकप्रियता मिळवली. यापूर्वीच्या महिन्यात क्रेटाच्या 12 हजार 577 यूनिट्सची विक्री झाल्याचं समजतंय. याशिवाय मागील वर्षीच्या ऑगस्ट 2021च्या तुलनेत या गाडीच्या विक्रीत 0.1 टक्क्यांनी या ऑगस्ट 2022 मध्ये घट झाली आहे.

सर्वात सुरक्षित समजली जाणारी चौथ्या स्थानावर असलेली टाटा पंच आणि पाचव्या क्रमांकावर असलेली मारुती सुझुकी ईको यांची देखील जास्त प्रमाणात विक्री झाली आहे. या दोन्ही कारच्या अनुक्रमे 12,006 यूनिट आणि 11,999 युनिट्सची विक्री झाली आहे. ईकोच्या विक्रीत वर्षाला 12 टक्क्यांची वृद्धी झाली असल्याचं दिसतंय.

यासोबतच Hyundai कंपनीची Venue आणि Maruti Suzuki ची Ertiga अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. यांच्या Hyundai Venue च्या 11,240 तर Maruti Suzuki Ertiga च्या 9,314 युनिट्सची विक्री झाली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये व्हेन्यूचे 8,377 युनिट्स विकले गेले आहे. तसेच, मारुती सुझुकी अर्टिगा चे 6,251 युनिट्स विकले गेले होते. Hyundai Venue आणि Maruti Suzuki Ertiga च्या विक्रीत ऑगस्ट 2022 मध्ये प्रत्येकी 34 टक्के आणि 49 टक्क्यांची वृद्धी दिसून आली.

दरम्यान यंदाच्या वर्षी अनेक नवनवीन कार उत्पादक कंपन्यांच्या कार्सचे मॉडेल्स हिट ठरले. ऑगस्ट 2022 मधील टॉप-10 सर्वाधिक विकलेल्या यूटिलिटी व्हेइकल्सच्या यादीत किआ सेल्टोस, महिंद्रा बोलेरो आणि किआ सॉनेट यांचा अनुक्रमे 8वा, 9वा आणि 10वा क्रमांक लागतो. यांचे अनुक्रमे 8,652 युनिट्स, 8,246 युनिट्स आणि 7,838 युनिट्स विकले गेले आहेत. या तीनही मॉडेल्सच्या विक्रीत दरवर्षी वाढ दिसून येत आहे. महिंद्रा बोलेरोच्या विक्रीवर तर 156 टक्क्यांची वाढ दिसली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -