मिरज प्रभाग क्रमांक 6 मधील मुजावर गल्ली येथील ड्रेनेज आणि रस्ते कामाचे नगरसेविका डॉ.नर्सिस सय्यद आणि गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्या उद्घाटन:-

ताजी बातमी ऑनलाईन टीम

प्रभाग क्रमांक 6 च्या नगरसेविका डॉ.नर्गिस सय्यद यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत ड्रेनेज आणि रस्ते कामाचे उद्घाटन केले.कोव्हिड काळापासून या भागातील नागरिकांच्या ड्रेनेज साठी तक्रारी आल्या होत्या.त्यावेळेस नगरसेविका यांनी सर्वे केल्यानंतर समजून आले की या भागामध्ये ड्रेनेज लाईन खराब झाली आहे.त्यावेळी तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांना बोलावून त्यांना सर्वे करुन ड्रेनेजसाठी 14 लाख रुपये मंजूर करुन घेतले.तसेच डी.पी.डी.सी मधून रोडसाठी 19 लाख रुपये मंजूर झालेले आहेत.आज या ड्रेनेज कामाचा शुभारंभ नगरसेविका डॉ.नर्गिस सय्यद, गटनेते मैनुद्दीन बागवान आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेविका नर्गिस सय्यद यांनी सांगितले की ड्रेनेज काम झाल्यानंतर लगेचच या भागात सुसज्ज असे हाॅटमिक्स चे रोड सुध्दा होतील असा नागरिकांना विश्वास दिला.

Join our WhatsApp group