Sangli : स्वच्छतागृहात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

आटपाडी बस स्थानकातील स्वच्छतागृहात गुरुवारी सकाळी दहा वाजता प्रवीण अशोक जाधव (वय ३६) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. प्रवीण यांच्या चेहन्यावर अनेक व्रण होते. त्याच्या नाका-तोंडातून रक्त येत असल्याने घातपात की अपघात, याबाबत संशय व्यक्त होत आहे.

गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बसस्थानक स्वच्छता कर्मचारी हा स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी गेला होता. तेथील एका शौचालयाचा आतून दूरवाजा बंद असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्याने अनेकवेळा दरवाजा वाजवून आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याने आटपाडी आगाराचे वाहतूक अधीक्षक संजय शिवराम माने यांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी शौचालयाचा दरवाजा तोडून काढला असता तरुणाचा मृतदेह आढळून आला.

आटपाडी ग्रामीण रुग्णालयात हा मृतदेह प्रवीण अशोक जाधव याचा असल्याचे स्पष्ट झाले त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. हा अपघात की घातपात? हे मात्र नेमके समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास आटपाडी पोलीस ठाणे करत आहे.

Join our WhatsApp group