अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यास मदत करणाऱ्या दोघांना अटक: कुपवाड पोलिसांची कारवाई

कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यास संशयित परशराम उर्फ सतीश भारत माने (वय २१, रा. सावळी) याला मदत करणाऱ्या दोघांना कुपवाड पोलिसांनी अटक केली. राजेंद्र श्रीमंत नाईक (वय २७, रा. आरग, ता. मिरज) व संदीप मलकाप्पा मड्यागोळ (वय २९, रा. हनुमाननगर, मिरज रोड, सावळी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी संशयित परशराम उर्फ सतीश माने याने एका अल्पवयीन मुलीचे दि. २८ मे २०२२ रोजी दुपारी अपहरण केले होते. याबाबत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी कुपवाड पोलिसात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित माने व अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी कुपवाड पोलिस ठाण्यातील एक पथक महाराष्ट्रासह कर्नाटकात रवाना झाले होते. १३ महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता.15 सप्टेंबर रोजी पोलिसांना संशयित माने याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने रात्री उशिरा सापळा रचून माने यास जेरबंद केले. अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यास दोन तरुणांनी मदत केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. कुपवाड पोलिसांनी संशयित राजेंद्र नाईक व संदीप मड्यागोळ यांना अटक केली.

Join our WhatsApp group