Friday, March 29, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : जिल्हय़ातील शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणार ; आमदार हसन मुश्रीफ

कोल्हापूर : जिल्हय़ातील शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणार ; आमदार हसन मुश्रीफ

शेतकऱ्यांनी ऊसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय जरी राज्य सरकारने घेतला असला तरी कोल्हापूर जिल्हय़ातील साखर कारखाने शेतकऱ्यांना एकरकमीच एफआरपी देतील अशी स्पष्टोक्ती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतची घोषणा आमदार मुश्रीफ यांनी केली. जिल्हा बँकेची 84 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदिरमध्ये झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालिंदर पाटील यांनी एफआरपीचा मुद्दा उपस्थित केला.

ते म्हणाले 2022-23 च्या गाळप हंगामाबाबत मंत्री समितीची बैठक झाली. यामध्ये शेतकऱ्यांना दोन तुकडय़ात एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री समितीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने एफआरपी एकरकमी देण्याबाबत आमदार मुश्रीफ यांनी सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी पाटील यांनी केली. यावर आमदार मुश्रीफ यांनी मंत्री समितीने एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हय़ातील साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमीच एफआरपी देतील अशी घोषणा आमदार मुश्रीफ यांनी यावेळी केली.

ऊस दरासाठी जिल्हय़ात आंदोलन नको

आमदार मुश्रीफ यांनी एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केल्यानंतर जिल्हय़ाबँकेच्या सभेसाठी उपस्थित सभासदांपैकी काही सभासदांनी जलिंदर पाटील यांच्याकडे तुमची एकरकमी एफआरपीची मागणी जिल्हय़ात तरी मान्य झाली आहे. त्यामुळे पुढील काळात जिल्हय़ात ऊस दरासाठी आंदोलन करु नका, अशी मागणी केली. तसेच कोल्हापूरबाहेरील शेतकरयांना एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी आंदोलन करा, यामध्ये आम्हीही सहभागी होतो, अशीही भुमिका सभासदांनी मांडले.

आठवडा भरात प्रोत्साहनचे पैसे

एकरकमी एफआरपी देण्याच्या घोषणेनंतर आमदार मुश्रीफ यांनी प्रोत्साहनपर अनुदान संदर्भात सहकार आयुक्तांशी चर्चा झाली असून पुढील आडवडाभरात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे जमा होतील अशीही माहिती आमदार मुश्रीफ यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -