Friday, March 29, 2024
Homeतंत्रज्ञानआता यूट्यूबवर ‘एवढ्या’ जाहिराती दिसणार? कंपनीने स्पष्टच सांगितलं..

आता यूट्यूबवर ‘एवढ्या’ जाहिराती दिसणार? कंपनीने स्पष्टच सांगितलं..

युट्यूब हे लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे एखादे गाणे किंवा व्हीडिओ जर आपल्याला आठवले आणि ते पाहायचे असेल तर आपण ते सर्च करून लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि एन्जॉय करत असतो. याशिवाय आपण युट्यूबवर अनेक व्हिडीओ पाहतो ज्यामध्ये आपण ते सर्च करून पाहतो, ऐकतो. अशाचप्रकारे एखाद्या आवडत्या चित्रपट किंवा चित्रपटाचा एखादा सीन, नाटक किंवा कोर्स पासून Vlog पर्यंत अनेक आवडत्या गोष्टी पाहण्यासाठी आपण युट्यूब वापरतो.

आता युट्यूब पाहताना तुम्ही अनेकदा एखादा कोणताही व्हिडीओ पाहण्यासाठी सुरु करताना अगदी सुरुवातीलाच जाहिराती दाखविल्या जातात. काही जाहिराती पाहिल्यानंतर 3 सेकंदांनंतर तर कधी तर काही जाहिराती पाहिल्यानंतर 5 सेकंदांनतर आपल्याला त्या बंद करून चुकविताही येतात. Youtube वर कोणताही व्हिडीओ आपण पाहत असलो की तिथे Skip ad असा पर्याय येतो
आणि आपण त्यावर क्लिक करून Youtube Advertisement बंद करतो आणि पुढे आपण पाहत असलेला व्हिडीओ तसाच चालू होतो.

आता महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर एका यूजरच्या लक्षात आलं की युट्यूब काही दिवसांपासून खूप जाहिरात दाखवत आहे. कधीकधी तर एकामागून एक जाहिरात आपण कोणताही व्हिडीओ चालू ठेवला की चालूच राहतात. पण कधीकधी तर या जाहिराती स्किप करता येत नाहीत. त्या जाहिराती संपेपर्यंत आपल्याला पूर्ण पाहाव्याच लागतात, मग त्यानंतर आपण आपल्याला वाटेल तो व्हिडिओ पाहत असतो.

आता लवकरच युट्यूबवर व्हिडीओ सुरू होण्याआधी अधूनमधून बऱ्याच जाहिराती दिसू शकतात. युट्यूबवर व्हिडीओ सुरू होण्याआधी 5 जाहिराती दिसायला सुरुवात झाली आहे. म्हणून यूट्यूब वापरकर्ते यामुळे भलतेच नाराजी झाल्याचं दिसत आहेत. अनेक जणांनी ट्विटरवर याबाबत चर्चा केली आहे. त्यावर कंपनी म्हणाली, “विशिष्ट प्रकारच्या जाहिरातीच्या फॉरमॅटबरोबर असे होऊ शकते, अशा जाहिरातींना ‘बंपर ॲड्स’ म्हटले जाते. त्यातील प्रत्येक जाहिरात केवळ 6 सेकंदाची असणार आहे. म्हणजे एखादा व्हिडीओ सुरू होण्याआधी एकुण जाहिरातींचा वेळ 30 सेकंदाचा असू शकतो. तसेच याबाबत वापरकर्ते ‘सेंड फिडबॅक’ या पर्यायावरून फिडबॅक नोंदवू शकतात”, असं म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -