मृत्यूतांडव! इंडोनेशियात फुटबॉलची मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमचे समर्थक आमने-सामने, हाणामारीत 129 जणांचा मृत्यू


इंडोनेशियामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात 127 जणांचा मृत्यू झाला. तर या हिंसाचारात 180 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इंडोनेशियाच्या मलंग रीजेंसीच्या कंजुरुहान स्टेडियमवर ही घटना घडली आहे. फुटबॉल मॅच हारल्यानंतर दोन्ही टीमचे समर्थक आमने-सामने आले आणि हा हिंसाचार झाला.इंडोनेशियातील मलंग रीजेंसीच्या कंजुरुहान या स्टेडियमवर दोन टीममध्ये सामना रंगला होता. एका टीमने सामना हरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला. एएफपी वृत्तसंस्थेनं पोलिसांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. पूर्व जावा येथील सामन्यानंतर संतप्त फुटबॉल चाहत्यांनी मैदानावर हल्ला एकच राडा घातला. दोन्ही टीमचे समर्थक आमने-सामने आले. या हिंसाचारामध्ये दोन पोलिसांचाही मृत्यू झाला आहे.

इंडोनेशियामध्ये Persebaya Surabaya ने Arema FC कडून फुटबॉल सामना 3-2 ने जिंकला. त्यानंतर अरेमा एफसीचे हजारो चाहते फुटबॉलच्या मैदानात उतरले आणि हिंसाचार सुरू केला. यानंतर स्थानिक पोलिस आणि इंडोनेशियाच्या राष्ट्रीय सशस्त्र दलाचे सदस्य मैदानात दाखल झाले आणि Persebaya Surabaya च्या खेळाडूंना संरक्षण देण्यात आले. मैदानात सुरक्षा दल आणि फुटबॉलचे चाहते यांच्यात जोरदार राडा झाला. यादरम्यान फुटबॉल चाहत्यांनी सुरक्षा जवानांवर वस्तू फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात आला.

या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की कशापद्धतीने फुटबॉलच्या मैदानावर मृत्यू तांडव सुरु आहे. फुटबॉलच्या प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं मैदानात उतरुन इकडे-तिकडे फुटबॉल फेकताना दिसत आहेत. त्याचवेळी पोलिस मध्यस्थी करण्यासाठी मैदानात धाव घेताना पाहयला मिळच आहे. यावेळी पोलिसांनी हिंसाचार थांबवण्यासाठी लाठीचार्ज करुन जमावाला पांगवण्याच्या प्रयत्न केला.

Join our WhatsApp group